एकूण प्रत्यक्ष कर लक्ष्याच्या 87 टक्के
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
चालू आर्थिक वर्षात (2022-23) 10 जानेवारीपर्यंत देशाचे एकूण प्रत्यक्ष कर संकलन 24.58 टक्क्मयांनी वाढून 14.71 लाख कोटी रुपये इतके झाले आहे. या वाढीचा मुख्य वाटा वैयक्तिक प्राप्तिकराचा आहे. चालू आर्थिक वर्षात 10 जानेवारीपर्यंत सरकारकडून परतावा मिळाल्यानंतर निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 19.55 टक्क्मयांनी वाढले आहे. हे संकलन चालू आर्थिक वर्षाच्या एकूण अंदाजपत्रकाच्या 86.68 टक्के आहे. यासंबंधीची आकडेवारी नुकतीच जाहीर करण्यात आली.
10 जानेवारी 2023 पर्यंत प्रत्यक्ष कर संकलनाची प्राथमिक आकडेवारी स्थिर वाढ दर्शवते. प्रत्यक्ष कर संकलन 14.71 लाख कोटी रुपये इतके झाले असून गेल्यावषीच्या याच कालावधीच्या तुलनेत ते 24.58 टक्क्मयांनी जास्त असल्याचे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने (सीबीडीटी) एका निवेदनात म्हटले आहे. या कालावधीत निव्वळ कर संकलन 12.31 लाख कोटी रुपये झाले आहे. तर आर्थिक वर्ष 2023 च्या अर्थसंकल्पामध्ये 13 लाख कोटी रुपये जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
‘सीआयटी’मध्ये 20 टक्के, ‘पीआयटी’मध्ये 30 टक्के वाढ
अर्थसंकल्पात, 2022-23 या आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलन 14.20 लाख कोटी रुपये असण्याचा अंदाज आहे. एकंदर कॉर्पोरेट कर (सीआयटी) संकलन 19.72 टक्क्मयांनी, तर वैयक्तिक प्राप्तिकर (पीआयटी) संकलनात 30.46 टक्क्मयांनी वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. परतावा समायोजित केल्यानंतर, सीआयटी संकलनात 18.33 टक्के निव्वळ वाढ झाली. तर पीआयटी 20.97 टक्क्मयांनी वाढली. वित्त मंत्रालयाने 10 जानेवारीपर्यंत 2.40 लाख कोटी रुपयांचा परतावा जारी केला आहे, जो मागील वषी याच कालावधीत जारी केलेल्या परताव्यापेक्षा 58.74 टक्के जास्त आहे.
जीडीपी अंदाज
चालू आर्थिक वर्षासाठी जीडीपी दराचा अंदाज गेल्या आठवडय़ात जाहीर करण्यात आला. हा दर 15.4 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तर चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला अर्थसंकल्पात 11.1 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. यामुळे सरकारला अर्थसंकल्पीय अंदाजापेक्षा 97,000 कोटी रुपये अतिरिक्त खर्च करता येण्याबरोबरच 6.44 टक्के वित्तीय तुटीचे लक्ष्य गाठता येईल, अशी अपेक्षा आहे.