नवी दिल्ली / वृत्तसंस्था
विदेशी चलन कायद्याचा भंग केल्याप्रकरणी ऍम्नेस्टी इंटरनॅशनल इंडिया या संस्थेला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. संस्थेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आकार पटेल यांना ही नोटीस देण्यात आली. फेमा या कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप या संस्थेवर आहे. संचालनालयाने या संस्थेला दोन वेगवेगळय़ा प्रकरणांमध्ये 51.72 कोटी रुपये आणि 10 कोटी रुपये असा एकंदर 61.72 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. ऍम्नेस्टी इंटरनॅशनल (युनायटेड किंग्डम) या आपल्या पितृसंस्थेबरोबर या रकमेचा बेकायदेशीर व्यवहार केल्याप्रकरणी ही नोटीस काढण्यात आली आहे.