संबंधितासमोर उद्भवतात अनेक समस्या
गुन्हेगार पकडायचा असो किंवा हरवलेल्या मुलाचा शोदा घ्यायचा असो, फिंगरप्रिंटच उपयुक्त ठरत असतात. ओळखपत्र मिळविण्यासाठी सर्वप्रथम हाताच्या बोटांचे ठसे घेतले जातात, परंतु एक आजार असा आहे, ज्यात उर्वरित सर्वकाही सुरळीत राहते, केवळ रुग्णाचे फिंगरप्रिंट गायब होतात.
एड्रमेटोग्लीफिया जेनेटिर आजार असून याचा पहिला रुग्ण 2007 मध्ये मिळाला होता. विदेशातील एक महिला अमेरिकेत जाण्याचा प्रयत्न करत होती, तिचा चेहरा पासपोर्टमधील छायाचित्राशी मिळताजुळता होता, परंतु कस्टम अधिकाऱयांना फिंगरप्रिंट जुळत नसल्याचे आढळून आले होते, या महिलेचे फिंगरप्रिंटच नसल्याने ही समस्या उद्भवली होती.


त्याचवेळी बांगलादेशातही अशीच घटना घडली होती, तेथे एक किंवा दोन लोकांना नव्हे तर पूर्ण कुटुंबात ही समस्या होती. राष्ट्रीय ओळखपत्र तयार करण्यासाठी हे कुटुंब शासकीय कार्यालयात पोहोचल्यावर अधिकारी अवाप् झाले. कुटुंबातील कुठल्याच सदस्याला फिंगरप्रिंटच नव्हते. मग अनेक कागदपत्रे उपलब्ध केल्यावर या कुटुंबाला ओळखपत्रे मिळाली, परंतु त्यातही फिंगरप्रिंट नसल्याचा उल्लेख करण्यात आला.
काही लोकांसोबत असे का घडतेय याचा अभ्यास केल्यावर एड्रमेटोग्लीफिया आजाराचा शोध लागला. हा एक दुर्लभ जेनेटिक आजार असून यात हस्तरेषाचा नसतात. भ्रूणाच्या विकासादरम्यानच त्याच्या हस्तरेषा तयार होत असतात. फिंगरप्रिंट म्हणजे बोटांवरील रेषांचा विशेष पॅटर्न जो गोलाकृती देखील असू शकतो किंवा अन्य पॅटर्नही असण्याची शक्यता आहे, ज्याला डर्मैटोग्लिफ म्हटले जाते. हस्तरेषा नसण्याच्या स्थितीला एड्रमेटोग्लीफिया म्हटले गेले आहे.
गरोदरपणादरम्यान भूणाच्या शरीरात एक जीन स्मारकॅड1 मध्ये म्युटेशन होते, हाच जीन गर्भाच्या बोटांवर खुणा तयार करण्यासाठी जबाबदार असतो, याचबरोबर या आजारात स्वेट ग्लँड्ल म्हणजेच घाम आणणाऱया ग्रंथी कमी होत जातात. यामुळे योग्यप्रकारे घाम येत नाही. तापमानात बदल झाल्यावर यामुळे रुग्णाला अनेक अडचणी होऊ लागतात. अधिक शारीरिक मेहनत करणेही अशा लोकांसाठी धोकादायक असते, कारण यामुळे शरीरात उष्णता तयार होईल, परंतु घाम तयार करणाऱया ग्रंथी नसल्याने उष्णता लवकर बाहेर पडू शकणार नाही.
ओळखपत्र नसल्याने समस्या
जवळपास पूर्ण जगात फिंगरप्रिंटला नैसर्गिक ओळख मानले जाते. तर या आजारामुळे ओळखपत्र मिळविणे जवळपास अशक्य ठरते. अन्य देशात रोजगारासाठी जाणे अवघड ठरते. याचमुळे या आजाराला इमिग्रेशन डिले डिसिस्ज देखील म्हटले जाते.