Tarun Bharat

बदलीसाठी दबाव आणणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणार – रवींद्र चव्हाण

ऑनलाईन टीम/तरुण भारत

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अनेक अधिकारी आपल्या पदस्थापनेच्या ठिकाणी अद्यापही रुजू झालेले नाहीत. तसेच काही अधिकारी हे त्यांच्या सोयीनुसार त्यांना पदस्थापना मिळावी यासाठी विविध माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही निर्दशनास आले आहे. परंतु अशा अधिकारी- कर्मचा-यांवर यापुढे कोणत्याही प्रकारची सहानुभूती न दाखविता जे अधिकारी बदलीच्या अथवा पदोन्नतीच्या ठिकाणी रुजू झाले नाहीत अशा अधिका-यांना तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्याविरुध्द शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाल्ल्यांची आढावा बैठक संपन्न झाली. याबैठकीला विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मंत्री रविंद्र चव्हाण यांनी अधिकाऱ्यांच्या कामाचा व त्यांच्या कार्यपध्दतीचा आढावा घेतला. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या आस्थापनेचाही आढावा घेतला. याप्रसंगी अनेक अधिकारी व कर्मचारी त्यांच्या पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होत नसल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाची विहित कामे मुदतीमध्ये पूर्ण होत नाहीत व त्यांच्या कामाचा ताण हा अन्य अधिकाऱ्यांवर पडत असल्याची गंभीर बाब यावेळी मंत्री चव्हाण यांच्या निदर्शनास आली. या गंभीर विषयांची मंत्री चव्हाण यांनी दखल घेत जे अधिकारी दृ कर्मचारी आपल्या पदस्थापनेच्या ठिकाणी तातडीने रुजु होणार नाहीत व आपल्या कामाचा पदभार स्वीकारून काम करणार नाहीत. अशा अधिकारी-कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्या विरुध्द शिस्तभंगाची कारवाई सुरु करण्याचे आदेश मंत्री चव्हाण यांनी या बैठकीतच दिले.

रस्त्यावरील खड्य़ांचा विषय हा सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी अधिकारी व कर्मचारी चालढकल करीत असल्याचेही निर्दशनास आले आहे. त्यामुळे जनतेची मोठ्य़ा प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्यासाठी मोबाईल ऍप तयार करण्यात यावे. त्याचप्रमाणे खड्डे मुक्त रस्ते करण्यासाठी कामाची गती वाढविणे गरजेचे असून जी कामे सध्या अपूर्ण आहेत ती काम आता युध्दपातळीवर पूर्ण करण्याचे आदेशही मंत्री चव्हाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

रस्यांवरील खड्डयांची कामे पावसाळ्यामुळे अपूर्ण राहिली असतील तर ही कामे कोणत्याही परिस्थितीत पावसाळ्यानंतर लवकरात लवकर पूर्ण करुन रस्त्यांवरील खड्डे मुक्त करण्याच्या कामाला लागा व जनतेला दिलासा द्या, तसेच या कामाच्यादृष्टीने सर्व अधिकाल्ल्यांनी आपापल्या पातळीवर नियोजन करण्याच्या सूचनाही मंत्री चव्हाण यांनी दिल्या.

Related Stories

फडणवीसजी तुम्हाला माशा मारण्याशिवाय कामच काय उरलं आहे?

Tousif Mujawar

फडणवीसांचे ड्रग्ज पेडलर जयदीप राणाशी संबंध

datta jadhav

रेठरेधरणमध्ये नर जातीचा बिबट्या आढळला मृतावस्थेत

Archana Banage

धनदांडग्यांसाठीच महाविकास आघाडी सरकारचे ओबीसी आरक्षणाकडे दुर्लक्ष

Archana Banage

चंद्रकांत पाटलांचा विरोधकांवर घणाघात;राज्यातील 63 हजार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला

Archana Banage

रशियाकडून तात्पुरता युद्धविराम

datta jadhav