Tarun Bharat

45 वर्षांनंतर ‘दाई’ चा शोध

Advertisements

अगदी नेणत्या वयात ज्यांनी प्रेम आणि संरक्षण दिले अशा व्यक्तींना माणूस सहसा विसरत नाही. विशेषतः जन्माला आल्यानंतर सांभाळ करणारी ‘दाई’ त्याला कायमचीच लक्षात राहते. कालांतराने या दाईची ताटातूट झाल्यास तिला शोधण्यासाठी पुढे मोठय़ा वयातही प्रयत्न केले जातात. तिला शोधल्याखेरीज आणि भेटल्याखेरीज माणसांना करमत नाही. अगदी जन्मदात्या आईपेक्षाही दाईची माया कित्येकांना महत्त्वाची वाटते. अशीच एक घटना जॉन्सन हुवानितो नावाच्या व्यक्तीच्या संदर्भात घडली आहे. जॉन्सन यांचा जन्म झाल्यानंतर पाच वर्षे एका दाईने त्यांचा सांभाळ केला. त्यांचा जन्म स्पेनमध्ये झाला होता. ते सहा महिन्यांचे असताना त्यांचे माता-पिता त्यांना घेऊन दक्षिण अमेरिकेतील बोलिविया या देशात स्थायिक झाले. त्यावेळी ऍना नामक एक महिला त्यांचा सांभाळ करण्यासाठी त्यावेळी ऍना 31 वर्षांची होती. तिने जॉन्सन यांचा पाच वर्षांहून अधिक काळ सांभाळ केला. त्यानंतर जॉन्सन यांचा परिवार पुन्हा स्पेनमध्ये स्थायिक झाला.

मात्र त्यांची दाई ऍना ही बोलिवियातच राहिली. पुढे जॉन्सन मोठे झाले. त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. मात्र, ते मनातल्या मनात त्यांचा सांभाळ करणाऱया दाईच्या आठवणीने व्याकुळलेलेच राहिले. तिला शोधणे आणि भेटणे हे त्यांनी आपले ध्येय मानले. तथापि स्पेन आणि बोलिविया यांच्यातील अंतर लक्षात घेता तिला शोधणे जवळपास अशक्य होते. तब्बल 45 वर्षे त्यांची ही इच्छा अपुरीच राहिली होती. मात्र 45 वर्षांनंतर त्यांनी दाईला शोधण्याचा जोरदार प्रयत्न सुरू केला. अखेरीस बोलिवियातल्या एका खेडय़ात महतप्रयासानंतर तिचा शोध लागला. ती अत्यंत दरिद्री अवस्थेत होती. तिला साहाय्य करण्यासाठी जॉन्सन यांनी ‘ए हेल्प फॉर ऍना’ नामक एक विश्वस्थ संस्थाही सुरू केली आहे. ऍना सध्या त्याच खेडय़ात आपल्या मुलाबरोबर राहत आहे. तिचे वय 78 वर्षांचे आहे. तर जॉन्सन सध्या 51 वर्षांचे आहेत. या दोघांची भेट अत्यंत भावपूर्ण होती. आणि दोघांनाही अश्रू आवरत नव्हते, असे प्रत्यक्षदर्शीनी म्हटले आहे.

Related Stories

10 वर्षीय युटय़ूबरची ‘बंपर’ कमाई

Patil_p

इटलीत कोरोनाबळींनी ओलांडला 75 हजारांचा आकडा

datta jadhav

हेडफोनमुळे श्रवणशक्तीवर परिणाम

Patil_p

6 दिवसांत आयुर्वेदिक औषधाने कोरोनामुक्त

Patil_p

`स्वीस इंडिया’च्या टॅगिंगमुळे `कोकणच्या राजा’ला झळाळी !

Archana Banage

हायड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या ट्रायलला बंदी : WHO

datta jadhav
error: Content is protected !!