प्रतिनिधी /पणजी
आम आदमी पक्षाचे नेते, स्वयंसेवक आणि पदाधिकाऱयांनी रविवारी फोंडा येथे झालेल्या बैठकीत आगामी विधानसभेच्या अधिवेशनात कोणते प्रश्न मांडायचे यावर चर्चा केली.
बैठकीत आपचे कार्याध्यक्ष आणि आप बाणावलीचे आमदार कॅप्टन व्हेंझी व्हिएगस यांनी पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पक्ष मजबूत करण्यासाठी विविध उपक्रमांबाबत मार्गदर्शन केले. दुसरीकडे आपचे कार्याध्यक्ष आणि आप वेळ्ळीचे आमदार इंजिनियर क्रूझ सिल्वा यांनी पक्षाचे नेते आणि पक्षाच्या स्वयंसेवकांना विधानसभा कामकाजाबाबत माहिती दिली.
यावेळी ’आप’चे उपाध्यक्ष ऍड. सुरेल तिळव, माजी उद्योगमंत्री तथा महाराष्ट्र राज्य निवडणूक निरीक्षक तथा आप गोवा प्रचार समितीचे अध्यक्ष महादेव नाईक आणि राज्यभरातील सर्व मतदारसंघाचे आप सदस्य उपस्थित होते.
या बैठकीत आप आमदारांना गोव्यांबद्दलचे प्रश्न उपस्थित करण्यासाठी डेटा गोळा करण्यासाठी आणि आगामी विधानसभा अधिवेशनाशी संबंधित इतर कामांमध्ये आमदारांना मदत करण्यासाठी उपसमित्यांची स्थापना करण्यात आली.
’आप’ला गोमंतकीयांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. नागरिकांकडून आलेल्या प्रश्नांनुसार आपने विधानसभेत उपस्थित होणाऱया प्रश्नांची यादी तयार केली आहे. गोमंतकीयांचा आवाज म्हणून आप विधानसभेत गोमंतकीयांचे प्रत्येक प्रश्न मांडेल.
आतापर्यंत आपला गोमंतकीयांकडून शेकडोहून अधिक प्रश्न प्राप्त झाले आहेत आणि हे प्रश्न आमदार आगामी विधानसभा अधिवेशनात मांडणार आहेत. अजूनही कोणाला त्यांचे प्रश्न पक्षाकडे पाठवायचे असतील तर ते मेलद्वारे करू शकतात, असे आपच्या नेत्यांनी यावेळी सांगितले.