Tarun Bharat

सीजीएसटी आयुक्तांची व्यापारी-उद्योजकांशी चर्चा

रंजना झा यांनी जीएसटी कौन्सिल मीटमधील  बदला संदर्भात दिली माहिती

प्रतिनिधी /बेळगाव

बेंगळूर येथील सीजीएसटी विभागाच्या मुख्य आयुक्त रंजना झा यांनी उद्योजक, चेंबर ऑफ कॉमर्सचे कर्मचारी, चार्टर्ड अकौंटंट असोसिएशन, सीए संघ, व्यापारी यांच्यासोबत बैठक घेतली. 47 व्या जीएसटी कौन्सिल मीटमध्ये कोणते बदल सुचविण्यात आले याबद्दल माहिती दिली. येत्या शुक्रवारी व मंगळवारी आऊटरिच कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष, दाल्मिया सिमेंटचे प्रतिनिधी यांनी सीजीएसटीमध्ये केलेल्या बदलांचे स्वागत केले. तसेच काही बदलही सुचविले. रंजना झा यांनी सर्व तक्रारी ऐकून घेऊन राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील अधिकाऱयांपर्यंत पोहोचवू, असे सांगितले. करदात्यांसोबत दर महिन्याला बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. या बैठकीला सीजीएसटी विभागाचे आयुक्त बसवराज नलगावी, उपायुक्त राजू सागी यांच्यासह इतर उपस्थित होते. 

Related Stories

कर्नाटक विधानपरिषद निवडणुकीत भाजप-काँग्रेस तुल्यबळ, जेडी(एस)चा अपेक्षाभंग

Abhijeet Khandekar

दि बेळगाव मर्चंट्स सोसायटीतर्फे मुदत ठेव योजनेचा शुभारंभ

Patil_p

नगणतीबाबत चित्र अद्याप अस्पष्ट

Amit Kulkarni

कलाश्री समुहाच्या चौथ्या सोडतीचे आनंद चव्हाण ठरले मानकरी

Amit Kulkarni

राकसकोप जलाशयाच्या पाणीपातळीत अर्ध्या फुटाने वाढ

Patil_p

जैन समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

Patil_p