Tarun Bharat

साळगाव मतदारसंघाच्या विकास कामाबद्दल माजी मंत्री जयेश साळगावकरांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

प्रतिनिधी /म्हापसा

साळगावचे माजी आमदार जयेश साळगावकर यांनी साळगाव मतदारसंघातील सरपंच, पंच सदस्य यांच्यासमवेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची आल्तीनो बंगल्यावर भेट घेऊन त्यांच्याबरोबर साळगाव मतदारसंघातील विकास कामाबद्दल आढावा घेतला व या मतदारसंघात भेडसावणाऱया प्रमुख समस्यावर चर्चाही केली. विशेष म्हणजे गिरी, साळगाव, सांगोल्डामध्ये पंचायत घर उभारण्यास भर द्यावा. शिवाय साळगाव येथे क्रीडा मैदान उभारण्यास सरकारने प्राधान्य द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वयंपूर्ण मित्र योजना अंतर्गत गावची विकास कामे हाती घ्यावी शिवाय पंचायत राज योजनेंतर्गत 3 कोटी केंद्रातून येतात शिवाय 15 फायनेन्स योजनेंतर्गत आर्थिक निधी राज्यात येते त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली. केंद्र सरकारकडून व राज्य सरकारकडून विविध योजना आल्या आहेत. ते गोवोगावी घरोघरी पोचवाव्यात व त्याचा जनतेला फायदा करून द्यावा अशी मागणी यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. सरकारच्या विविध योजना आहेत त्याची माहिती प्रत्येक नागरिकास घरोघरी द्यावी असे मुख्यमंत्र्यांनी माजी मंत्री जयेश साळगावकरांना सूचित केले. यावेळी साळगाव सरपंच लुकास रेमेडीयस, पंच दयानंद मांद्रेकर, गिरी सरपंच सनी नानोडकर, सांगोल्डा सरपंच आदी पंच सदस्य यावेळी उपस्थित होते.

Related Stories

चोरलेल्या दुचाकीचा तपास लावण्यात वेर्णा पोलिसांना यश

Patil_p

तोतया मंत्री सुनिल सिंग व त्याच्या समुहावर कडक कारवाई करावी

Patil_p

महाराष्ट्र सरकारला आम्ही प्रत्युत्तर देणार नाही

Omkar B

कळसा – भंडुराच्या मान्यतेसाठी कर्नाटकडून केंद्रावर दबावतंत्र

Amit Kulkarni

फोंडय़ात स्वस्त दरात कांद्याची विक्री

Patil_p

‘लॉकडाऊन’चा राज्यातील काजू उत्पादकांना फटका

Patil_p