Tarun Bharat

जिल्ह्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची चर्चा

राज्यात बदल्यांचे वारे, सचिव दर्जाच्या सहा अधिकाऱ्यांच्या बदली

Advertisements

प्रतिनिधी/कोल्हापूर

प्रशासकीय पातळीवर ‘आयएएस’, ‘आयपीएस’ अधिकाऱ्यांच्या बदल्याचे वारे वाहू लागले आहे. राज्यातील सचिव दर्जाच्या सहा अधिकाऱयांच्या गुरूवारी बदलीचे आदेश काढले. या निमित्ताने कोल्हापूर जिल्हय़ातीलही अधिकाऱयांच्या बदल्याची चर्चा रंगू लागली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात आयएएस (भारतीय प्रशासकीय सेवा) आणि आयपीएस (भारतीय पोलीस सेवा) अधिकाऱयांच्या बदल्याची जोरदार चर्चा आहे. यामध्येच राज्य शासनातील सचिव दर्जाच्या सहा अधिकाऱयांची बदल्या झाल्या आहेत. यामुळे कोल्हापुरातील अधिकाऱयांच्या बदल्याची चर्चा रंगली आहे. यामध्ये कोल्हापूर महापालिका प्रशासक, पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांची बदली झाल्याची जोरदार चर्चा आहे. पुढील आठवडय़ात याचे अधिकृत आदेश निघणार असल्याचे बोलले जात आहे.

अंबाबाई मंदिरातही बदलीची चर्चा
प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची बदलीची चर्चा महापालिकेत सुरू आहे. यामध्येच अंबाबाई मंदिरात गुरूवारी शेजारील जिल्हय़ातील एक ‘आयएएस’ आधिकारी दर्शनासाठी आले होते. त्यांची कोल्हापूर महापालिका प्रशासकपदी नियुक्त होणार असल्याची चर्चा मंदिर परिसरात सुरू होती.

Related Stories

कुंभोज येथे माकडांचा धुमाकूळ महिला व वाहनचालकांना केली मारहाण

Abhijeet Khandekar

वनमंत्री संजय राठोड हाय हाय..!

Archana Banage

शिये येथून दुसऱ्या दिवसाच्या जलसमाधी पदयात्रेला सुरुवात

Archana Banage

कोल्हापूर : शाहुवाडीतील कंटेन्मेंट झोन अखेर मागे

Archana Banage

वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित केल्यास पुर्नजोडणी शुल्क नियमानुसारच

Archana Banage

इचलकरंजीच्या दौऱ्यावर दोन गवे

Archana Banage
error: Content is protected !!