Tarun Bharat

विश्वजीतचा भविष्यकाळ काँग्रेसमध्ये चांगला- बाळासाहेब थोरात

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

काँग्रेस पक्षासाठी अडचणीचा काळ आहे, पण अडचणीचा काळ येत असतो आणि जात असतो. या अडचणीच्या काळातच तावून-सुलाखून नेतृत्व तयार होत असते, असे सूचक वक्तव्य करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी विश्वजीत कदम यांना वडिलकीचा सल्ला दिला. दरम्यान, पतंगराव कदम गेल्यानंतर विश्वजीत कदम यांना सांभाळून घ्यावे लागेल असे वाटत होतं. मात्र, आता विश्वजितच सगळ्यांना सांभाळत आहे. गडी एकदम बिलंदर आहे. काँग्रेसचा विचार, नेतृत्व पुढे घेऊन नेण्याची जबाबदारी आता विश्वजितवर आहे. विश्वजीत कदम यांचा भविष्यकाळ काँग्रेसमध्ये घडेल. तो दुसरीकडे कोठेही घडणार नाही. असे ते म्हणाले.

दरम्यान, भाजपात गेलेल्याची थप्पी लागली आहे. काहीजण तिकडची सत्ता आली म्हणून तिकडे गेले. नंतर पक्षाच्या मिटींगमध्ये ती लोक मागच्या ओळीत मोबाईलमध्ये पाहत खाली मान घालून बसलेली दिसतात, असा टोलाही लगावला. तसेच काँग्रेस मधील काही लोक काँग्रेस सोडून इतर पक्षात जाण्याच्या बातम्या येत आहेत. त्या पक्षात थप्पी लागली आहे. परंतु विश्वजीतला काँग्रेसमध्ये भविष्यकाळ चांगला आहे, असे प्रतिपादनथोरात यांनी केले. ते पलूस तालुक्यातील अंकलखोपमधील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या शताब्दी सोहळ्यात बोलत होते.

Related Stories

भाजी मंडईत खिशातून 8 हजार रुपये लंपास

Patil_p

व्यापायांची बदनामी करणायाला आवर घालण्याची गरज

Patil_p

बंडातात्या कराडकर करवडीत स्थानबद्ध

Patil_p

पोलीस जवान शरद बेबले यांचा सन्मान

Abhijeet Shinde

सांगली-कोल्हापूर एसटी हाऊसफुल्ल

Sumit Tambekar

मुंबई, पुणे पूर्णपणे बंद करणार?

datta jadhav
error: Content is protected !!