Tarun Bharat

वन्यजीव संरक्षण दुरुस्ती विधेयकावर राज्यसभेत चर्चा

संसदेच्या दोन्ही सभागृहात कामकाज सुरू

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

संसदेचे हिवाळी अधिवेशन बुधवार, 7 डिसेंबरपासून सुरू झाले आहे. पहिल्या दिवशी दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली आणि काही निवडक विषयांवर चर्चा झाल्यानंतर गुरुवारी सकाळी 11 वाजता दोन्ही सभागृहांचे दुसऱया दिवसाचे कामकाज सुरू झाले. केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी दुसऱया दिवशी उज्ज्वला योजनेची माहिती दिली. तसेच बहुराज्य सहकारी संस्था दुरुस्ती विधेयकावर लोकसभेत तर, ऊर्जा संवर्धन दुरुस्ती विधेयकावर राज्यसभेत चर्चा झाली.

संसदेतील गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. दोन वाजता पुन्हा कारवाई सुरू झाली, तेव्हा राज्यसभेत वन्यजीव (संरक्षण) दुरुस्ती विधेयक, 2022 वर चर्चा झाली. या चर्चेला पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी उत्तर दिले. लोकसभेत नियम 193 अन्वये भारतातील खेळांना प्रोत्साहन देण्याची गरज आणि त्यासंदर्भात सरकारने उचललेल्या पावलांवर चर्चा करण्यात आली.

संसदेचे हे अधिवेशन 17 दिवस चालणार आहे. यादरम्यान सरकार 16 विधेयके संसदेत मांडणार आहे. पहिल्या दिवशी, जिथे राज्यसभेत वन्यजीव संरक्षण (सुधारणा) विधेयक 2022 वर चर्चा झाली, तर लोकसभेत लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याची मागणी झाली.

काँग्रेसची बैठक

गुरुवारी सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक घेतली. संसदीय पक्षाच्या कार्यालयात ही बैठक होऊन सभागृहाची रणनीती ठरवण्यात आली. या बैठकीला सोनिया गांधी यांची उपस्थिती होती. तसेच पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सदस्यांना मार्गदर्शन केले.

Related Stories

कुतुबमिनारच्या उत्खननाचा विचार नाही!

Patil_p

पश्चिम बंगाल हिंसाचारात क्रौर्याचा कळस

Amit Kulkarni

अयोध्येतील राममंदिराच्या प्रसादाचे लाडू दुतावासांमार्फत जगभरात वाटणार

datta jadhav

सोमवारी पंतप्रधानांची सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा

Patil_p

युक्रेनमध्ये थिएटरवर बॉम्बहल्ला, तब्बल १२०० जण दबल्याची शक्यता

Abhijeet Khandekar

जवानांना रजेवर जाताना मिळणार MI-17 हेलिकॉप्टरची सेवा

datta jadhav