नवी दिल्ली
डायरेक्ट-टू-होम सॅटेलाइट चॅनेल पुरवणाऱया डिश टीव्हीचे अध्यक्ष जवाहरलाल गोयल यांनी कंपनीच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे.
जवाहरलाल गोयल यांनी कंपनीच्या संचालक मंडळ आणि समित्यांमधून राजीनामा दिला आहे, असे डिश टीव्हीने नुकतेच शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे. त्यांचा राजीनामा 19 सप्टेंबर 2022 रोजी कामकाजाची वेळ संपल्यानंतर लागू होणार असल्याची माहिती आहे.
त्यामुळे ते अध्यक्ष नाहीत राहणार
हे लक्षात घेण्यासारखे आहे की कंपनीची सर्वात मोठी भागधारक येस बँक लिमिटेड आहे. गोयल यांच्या नेतृत्वाखालील प्रवर्तक कुटुंबामध्ये डिश टीव्हीच्या संचालक मंडळावरील प्रतिनिधित्वावरून वाद सुरू आहे. येस बँकेची कंपनीत 24 टक्के हिस्सेदारी आहे. त्यांनी संचालक मंडळाची पुनर्रचना करण्याची आणि गोयल आणि इतर काहींना काढून टाकण्याची मागणी केलीय.