Tarun Bharat

दरेवाडी येथे डोक्यात दगडी वरवंटा घालून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या

Advertisements

पन्हाळा/प्रतिनिधी

 पन्हाळा तालुक्यातील दरेवाडी-आसुर्ले येथील घरगुती वादातून सोमवारी रात्री अकराच्या दरम्यान संशयित आरोपी पती बाबासो बळवंत जाधव (वय ४९) याने पत्नी अनिता जाधव (वय ४६) हिच्या डोक्यामध्ये दगडी वरवंटा घालून तिला ठार मारले.

जाधव दाम्पत्यामध्ये वारंवार वाद होत होते. सोमवारी रात्री हा वाद विकोपाला गेल्यानंतर चिडलेल्या पती बाबासो याने पत्नीच्या डोक्यात वरवंटा घातला. यात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर बाबासाहेब याला दारूचे व्यसन होते. तो कामधंदा करत नसल्याने त्याचे पत्नी व मुलाबरोबर नेहमी वाद होत होते, असे पोलिसांनी सांगितले.

या घटनेची फिर्याद मुलगा तेजस जाधव याने पन्हाळा पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे. संशयित आरोपीला पत्नीच्या खून प्रकरणी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पन्हाळा पोलीस निरीक्षक अरविंद काळे, पोलीस हे. कॉ. वैशाली राजपाल करत आहेत.

Related Stories

Kolhaour; तीन लाखाचा किमतीच्या सोने चोरीचा छडा; महिला ताब्यात

Abhijeet Khandekar

मराठा आरक्षणात केंद्राची भूमिका महत्वाची

Abhijeet Shinde

जातीच्या संघटनांनी आर्थिक प्रश्नावर लढले पाहिजे, अभाम महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांचं मत

Kalyani Amanagi

संजय राऊत कुणी महान नेते नाहीत- चंद्रकांतदादा पाटील

Sumit Tambekar

महापालिका क्षेत्रातील मंडपांची होणार तपासणी

Abhijeet Shinde

कृषीपंप धोरण 2020 अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 770 वीज जोडण्या

Abhijeet Shinde
error: Content is protected !!