तरुण भारत

साऊंड असोसिएशनच्या बैठकीत नवनवीन अटींवर नाराजी

पोलीस – मंडळांकडून सहकार्याची अपेक्षा

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

साऊंड असोसिएशन बेळगावच्या सदस्यांची बैठक पै रिसॉर्ट येथे झाली. डी. जे. संदर्भात सातत्याने नवनवीन अटी लागू करण्यात येत असल्याबद्दल सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच कोणत्याही स्वरुपाच्या मिरवणुकीवेळी डी. जे. लावण्यात येते. मात्र सार्वजनिक कार्यक्रमांसाठीच्या मिरवणुकीवेळी मंडळे सहकार्य करत नसल्याची खंतही यावेळी व्यक्त करण्यात आली.

दोन बेस, दोन टॉप यासाठी परवानगी द्यावी, ही संघटनेची मुख्य मागणी आहे. सायंकाळी 6 ते 9.30 या वेळेत डी.जे. लावला जाईल. वेळेची मर्यादा पाळली जाईल. परंतु प्रशासन, पोलीस आणि मंडळे यांचे आपल्याला सहकार्य हवे, अशी सदस्यांची मागणी आहे.

दरम्यान, सदस्यांनी आमदार अनिल बेनके यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपल्या अडचणी सांगितल्या. त्यांच्यासह शनिवारी सकाळी संघटनेचे सदस्य पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत, अशी माहिती अध्यक्ष शाम गौंडाडकर यांनी दिली.

Related Stories

बेळगावच्या उद्योगाची पूर्वपदाकडे वाटचाल

Patil_p

….तर सभागृहच बरखास्त करा

Patil_p

बेळगाव शहरात आणखी तीन बळी

Patil_p

येळ्ळूरच्या नवनिर्वाचित ग्रा.पं.सदस्यांची तरुण भारतला भेट

Amit Kulkarni

बेंगळूर : अश्लील साइट्सवर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे फोटो अपलोड केल्याप्रकरणी दोघांना अटक

Abhijeet Shinde

दरोडेखोर निघाले वीट भट्टीतील कामगार

Amit Kulkarni
error: Content is protected !!