प्रतिनिधी / ओरोस–
जिल्हा परिषदे मार्फत दिले जाणारे सन 2022 चे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत.
यामध्ये कुडाळ तालुक्यातून विजय बबन धामापूरकर ,पदवीधर शिक्षक , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निवजे नंबर 1, देवगड तालुक्यातून श्रीमती अदिती अविनाश राणे , पदवीधर शिक्षक, शाळा देवगड हिंदळे भंडारवाडा,
दोडामार्ग तालुक्यातून डॉ. उत्तम तुकाराम तानवडे, उपशिक्षक , जि. प. शाळा घोटगे वायंगणतड,कणकवली तालुक्यातून सत्यवान शांताराम चव्हाण, उपशिक्षक, शाळा तळेरे नंबर 1 मालवण तालुक्यातून गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर , उपशिक्षक, केंद्र शाळा मसुरे नंबर 1, सावंतवाडी तालुक्यातून केशव बाबी जाधव , पदवीधर शिक्षक, प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर 4, वैभववाडी तालुक्यातून श्रीमती राजश्री नामदेव शेटये, पदवीधर शिक्षक, नाधवडे ब्राह्मण देव नवलादेवी वाडी, वेंगुर्ला तालुक्यातून विनोद राजाराम मेतर, उपशिक्षक, कोचरे नंबर 2.
आदींचा समावेश आहे.