Tarun Bharat

डिसेंबरमध्ये लाळय़ा-खुरकत प्रतिबंधक लसीकरण

चार वर्षांवरील सर्व जनावरांना देणार लस : घरोघरी राबविणार मोहीम: शेतकऱयांना सहकार्याचे आवाहन

प्रतिनिधी /बेळगाव

राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत पुढील महिन्यापासून लाळय़ा खुरकत प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. लम्पी रोगामुळे काहीशी लांबणीवर पडलेली ही मोहीम डिसेंबर प्रारंभापासून सुरू होणार आहे. शेतकऱयांच्या घरोघरी जाऊन 4 वर्षांवरील सर्व जनावरांना ही लस दिली जाणार आहे. सर्व शेतकऱयांनी आपल्या जनावरांना प्रतिबंधक लस देऊन सहकार्य करावे, असे आवाहन पशुसंगोपनने केले आहे.

जिल्हय़ात 28 लाखांहून अधिक जनावरे आहेत. त्यामध्ये गाय, म्हैस, शेळय़ा-मेंढय़ा, मांजर, घोडा, कुत्रा, डुक्कर आदींचा समावेश आहे. यापैकी गाय, म्हैस, बैल आणि घोडय़ांना लस दिली जाणार आहे. वर्षभरात दोनवेळा ही मोहीम राबविली जाते. जून महिन्यात पहिल्या टप्प्यात मोहीम पार पडली आहे. मात्र, दुसऱया टप्प्यातील नोव्हेंबरची मोहीम लांबणीवर पडली आहे. लम्पी विषाणूजन्य रोगाने धुमाकूळ घातल्याने पशुसंगोपनचे काम वाढले आहे. त्यातच लाळय़ा खुरकत मोहीम लांबणीवर पडली होती. मात्र, आता लसीचा पुरवठा झाल्यानंतर मोहीम हाती घेतली
जाणार आहे.

मागील दोन वर्षांत कोरोनामुळे प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. कोरोनामुळे लसीकरण मोहीम घरोघरी राबविताना अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे बरीच जनावरे लसीकरणापासून वंचित राहिली होती. मात्र, यंदा मोहीम अधिक तीव्रपणे राबविली जाणार आहे. एकही जनावर लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी विशेष प्रयत्न राहणार आहेत.

जिल्हय़ात लम्पीचा प्रादुर्भाव कायम आहे. त्यामुळे लाळय़ा खुरकत प्रतिबंधक लसीकरण मोहीम कशी राबवावी? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, शासनाकडून प्रतिबंधक मोहीम राबविण्यासाठी हिरवाकंदील दाखविण्यात आला आहे. शिवाय येत्या आठवडाभरात लसीचा पुरवठाही केला जाणार आहे. संबंधित सर्व पशुवैद्यकीय अधिकऱयांना सूचना करण्यात आल्या आहेत. शिवाय घरोघरी जाऊन ही मोहीम राबविली जाणार आहे.

लाळय़ा खुरकत विषाणूजन्य रोगाची लागण झाल्यास जनावराच्या तोंडाला पुरळ उठून जनावर अशक्मत बनते. शिवाय वेळेत उपचार न झाल्यास दगावण्याची शक्मयता असते. यासाठी शेतकऱयांनी लसीकरण करून घ्यावे.

एकही जनावर वंचित राहणार नाही

जिल्हय़ात पुढील महिन्यापासून लाळय़ा खुरकत प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. शासनाकडून लसीचा पुरवठा दाखल होताच मोहीम हाती घेतली जाणार आहे. शिवाय लसीकरणापासून एकही जनावर वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे.

-डॉ. राजीव कुलेर (सहसंचालक, पशुसंगोपन)

Related Stories

हृदयविकाराबाबत समाजात जनजागृती आवश्यक

Amit Kulkarni

तांगडी गल्ली अडकली समस्यांच्या विळख्यात

Amit Kulkarni

रस्ता कामासाठी खासदार निधीतून दहा लाखाचा निधी

Amit Kulkarni

डेनेजसाठी खोदलेल्या चरीत वाहने अडकण्याचे प्रकार

Amit Kulkarni

सीमोल्लंघनासाठी शहर देवस्थान कमिटीचा निर्णय मान्य राहील

Patil_p

कर्नाटक हायकोर्टाने केंद्राला रोखले

Archana Banage