युरोपीय आरोग्य प्राधिकरणाने ‘मंकीपॉक्स’ या आजाराला आळा घालण्यासाठी स्पेन देशात पहिल्या टप्प्यात ५३०० लसी पाठवल्या आहेत. मंकीपॉक्स या आजारानं सर्वाधिक संक्रमित देशांना पुरेशा लसी पुरवण्यात येत आहेत. स्पेन देशानंतर पोर्तुगाल, जर्मनी आणि बेल्जीयम या देशांना या लसी पुरवल्या जाणार आहेत. अशी माहिती युरोपीय आयोगाच्या आरोग्य आणि खाद्य सुरक्षा आयुक्त स्टेला काइराकाइड्स यांनी दिली.
युरोपीय संघातल्या २७ मधल्या २३ देशात यावर्षी १८ मे पासून या आजाराने बाधित रुग्ण सापडत आहेत. एकूण दोन हजार ६८२ रुग्ण आतापर्यंत सापडले आहेत. मंकीपॉक्स हा आजार आधी पशूंमार्फत संक्रमित होतो त्यानंतर तो माणसाकडून माणसांमध्ये पसरतो.