विद्यार्थी शासकीय सुविधांपासून वंचित : दररोज पायपीट करणाऱया विद्यार्थ्यांना दिला आधार
वार्ताहर /कणकुंबी
जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनतर्फे कणकुंबी हायस्कूलमध्ये तळावडे गावाहून येणाऱया विद्यार्थ्यांना सायकली वितरित करण्यात आल्या. जायंट्स ग्रुप मेनचे प्रेसिडेंट शिवकुमार हिरेमठ व संचालक पद्मप्रसाद हुली यांच्या हस्ते सायकलींचे वितरण करण्यात आले.
श्री माउली विद्यालय कणकुंबी येथे तळावडे, हुळंद व माण आदी खेडय़ांतून 25 ते 30 विद्यार्थी शिक्षणासाठी पायी चालत येतात. या विद्यार्थ्यांना कुठल्याही शासकीय सुविधा मिळत नाहीत. ना रस्ता, ना वाहतुकीचे साधन, त्यामुळे या विद्यार्थ्यांना दररोज पायपीट करावी लागते. त्यामुळे जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनचे प्रेसिडेंट शिवकुमार हिरेमठ, डायरेक्टर पद्मप्रसाद हुली यांनी पाहणी करून विद्यार्थ्यांना सायकली देण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार त्यांना सायकलींचे वितरण केले. एस.जी.चिगुळकर यांनी स्वागत करून शिवकुमार हिरेमठ आणि पद्मप्रसाद हुली यांचा सत्कार केला.
ऑपरेशन मदत संस्थेतर्फे मध्यान्ह आहार कर्मचाऱयांचा सत्कार
बेळगाव येथील ‘ऑपरेशन मदत’ संस्थेतर्फे माउली हायस्कूलमध्ये मध्यान्ह आहार तयार करणाऱया महिलांचा साडी-चोळी देऊन सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी एस. जी. चिगुळकर होते. ऑपरेशन मदत संस्थेचे संचालक राहुल पाटील यांनी हा सामाजिक उपक्रम राबविला.
कणकुंबी हायस्कूलमध्ये पंधरा-वीस वर्षांपासून मध्यान्ह आहार योजनेचे प्रामाणिकपणे कार्य करणाऱया चार महिलांना ऑपरेशन मदततर्फे साडी-चोळी देऊन सत्कार केला. त्यांच्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘ऑपरेशन मदत’ संस्थेने महिलांचा सन्मान करण्याचे ठरविले होते. यावेळी शिक्षकवृंद व विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या. एन. एस. करंबळकर यांनी आभार मानले.