Tarun Bharat

जांबोटी मल्टीपर्पज सोसायटीतर्फे चिगुळे येथे वहय़ा वाटप

वार्ताहर /कणकुंबी

खानापूर तालुक्मयाच्या सहकार क्षेत्रातील अग्रगण्य समजल्या जाणाऱया दि जांबोटी मल्टीपर्पज सोसायटीने नेहमीच सहकार क्षेत्राबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व इतर अनेक बाबतीत सहकार्य केलेले आहे. विशेषतः देशाची भावी पिढी शिक्षणाच्या बाबतीत पुढे गेली पाहिजे, म्हणून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शैक्षणिक साहित्य वाटप करणे तसेच दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविणाऱया विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन गौरविण्यात येते. त्यानुसार यावषी पहिल्या टप्प्यात दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण करण्याचा उपक्रम राबविताना चिगुळे येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेपासून सुरुवात करण्यात आल्याची माहिती जांबोटी सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष विलास बेळगावकर यांनी दिली.

जांबोटी मल्टीपर्पज सोसायटीच्यावतीने सोमवारी चिगुळे येथील प्राथमिक मराठी शाळेत विद्यार्थ्यांना वहय़ा वाटप करण्यात आल्या. यावेळी विलास बेळगावकर, उपाध्यक्ष पुंडलिक नाकाडी, संचालक मनोहर डांगे, पांडुरंग नाईक, आपचे तालुका अध्यक्ष भैरू पाटील, सेवानिवृत्त सैनिक गणपत गावडे, कृष्णा गावडे, सोसायटीचे व्यवस्थापक विष्णू पवार व चिगुळे शाळा कमिटीचे सदस्य उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती गोरल यांनी स्वागत केले तर शिक्षिका श्रीमती पवार यांनी आभार मानले.

Related Stories

राम मंदिरविषयी विविध हिंदू संघटनांची बैठक

Patil_p

बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ात सीईटीला प्रारंभ

Tousif Mujawar

ट्रक्टर-दुचाकी धडकेत असोगा येथील युवक ठार

Amit Kulkarni

म्हादई प्रकल्प; केंद्रीय पर्यावरण विभागाचा कर्नाटक सरकारला दणका

Sandeep Gawade

मण्णूर येथे घर कोसळून नुकसान

Amit Kulkarni

हिंडलगा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा

Omkar B