Tarun Bharat

सहय़ाद्री सोसायटीतर्फे गरीब विद्यार्थ्यांना वहय़ा वाटप

दरवषी गरीब विद्यार्थ्यांना वहय़ा वाटपाचा संस्थेचा उपक्रम

वार्ताहर /सांबरा

पालकांनी आपल्या मुलांना मातृभाषेतूनच शिक्षण दिले पाहिजे, तसेच दहावीनंतर इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणे अनिवार्य असल्याने विद्यार्थ्यांनी मातृभाषेबरोबरच इंग्रजी भाषेवरही प्रभुत्व मिळविले पाहिजे, असे मत प्राचार्य आनंद व्ही. पाटील यांनी व्यक्त केले. बसरीकट्टी (ता. बेळगाव) येथे श्री महालक्ष्मी हायस्कूलमध्ये सह्याद्री आंतरराज्य बहुउद्देशीय सहकारी संस्थेच्यावतीने आयोजित गरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.

 या संस्थेच्यावतीने दरवषी गरीब विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले जाते. यावषीही बसरीकट्टी येथील श्री महालक्ष्मी हायस्कूल, हंगरगे येथील श्री काळम्मादेवी हायस्कूल, रणकुंडये येथील श्री विठ्ठल रामजी शिंदे हायस्कूल, वाघवडे हायस्कूल व हुक्केरी तालुक्मयातील सोलापूर हायस्कूल या ठिकाणी गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करून गणवेश घेण्यासाठी रक्कमही देण्यात आली. व्हा-चेअरमन विजय भोसले, संचालक पी. पी. बेळगावकर, किरण पाटील, गोपाळराव कातकर, संचालिका शीतल कोकितकर, व्यवस्थापक अनिल कणबरकर, सहा-व्यवस्थापक मारुती निलजकर आदींनी वह्यांचे वाटप केले. या उपक्रमास टिळकवाडी शाखा सल्लागार महादेव बिरजेंसह आर. के. पाटील, मारुती अम्मणगी व सिद्राई नागरोळी, कृष्णा हुंदरे, कृष्णा पाटील, निंगाप्पा पाटील व रवळू पाटील आदींचे सहकार्य लाभले. 

Related Stories

भाजपनेही सुरू केला प्रचाराचा झंझावात

Omkar B

कर्नाटक: बेळगावचा रुग्ण बरे होण्याचा दर सर्वात कमी

Archana Banage

व्हॅक्सिन डेपो येथे झाडे तोडल्याने तणाव

Patil_p

बैलगाडीच्या धडकेत कारचालक जखमी

Archana Banage

इन्स्टाग्रामवर वादग्रस्त पोस्ट

Amit Kulkarni

जितो लेडिज विंगतर्फे ‘पहचान’ वेबिनार

Amit Kulkarni