राष्ट्रीय परीक्षा संस्था आज पदवीपूर्व सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षेच्या पहिल्या टप्प्यासाठी प्रवेशपत्रांचे वितरण सुरु करणार आहे. संध्याकाळी ६ वाजल्यापासून याला सुरुवात होणार आहे.
संस्थेकडून काल पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी शहरनिहाय केंद्रांची माहिती प्रसिद्ध केली आहे. विध्यार्थ्यांना परीक्षा केंद्र cuet.samarth.ac.in या संकेतस्थळावर पाहता येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ९० विद्यापीठांमध्ये विविध विषयांच्या प्रवेशाकरता विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.