प्रतिनिधी /बेळगाव
जायंट्स सखीने उचगाव येथील मळेकरणी देवीच्या मंदिराला डस्टबीन भेट दिले आहेत. मळेकरणी देवस्थान कमिटीच्या सदस्या आणि ग्राम पंचायत माजी अध्यक्षा योगिता देसाई यांच्याकडे डस्टबीन सोपविण्यात आले.
मंदिरात येणाऱया भाविकांना प्लास्टिक ग्लास, वाटय़ा वापरण्यावर बंदी आणावी, जेणेकरून इथे कचरा तर कमी होईलच पण त्यामुळे होणारा पर्यावरणाचा ऱहास कमी होईल. नैसर्गिकरित्या प्लास्टिक कुजण्यास एक हजार वर्षांपेक्षा जास्त वेळ लागत असून हे प्लास्टिक मातीत साठून राहिल्याने भविष्यात नागरिकांना अन्न आणि पाणी मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागेल, असे फेडरेशनच्या सदस्या ज्योती अनगोळकर यांनी सांगितले.
या आवाहनाला प्रतिसाद देत योगिता देसाई यांनी, आपण देवस्थान समितीच्या माध्यमातून नक्कीच यावर विचार करू, असे सांगितले. यावेळी अध्यक्षा चंद्रा चोपडे, उपाध्यक्षा विद्या सरनोबत, अपर्णा पाटील, ज्योती सांगुकर, वैशाली भातकांडे, शीतल पाटील उपस्थित होत्या.