Tarun Bharat

देवाचीहट्टी शाळेत लोककल्पतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप

Advertisements

प्रतिनिधी /बेळगाव

लोककल्प फौंडेशन-लोकमान्य सोसायटीच्या सीएसआर उपक्रमाद्वारे देवाचीहट्टी येथील सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

लोककल्प फौंडेशनतर्फे दत्तक घेतलेल्या गावातील शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप केले जात आहे. देवाचीहट्टी येथील शाळेतील विद्यार्थ्यांना नोटबुक व स्टेशनरी साहित्याचे वाटप केले. याप्रसंगी लोककल्पच्या स्वयंसेविका सुहासिनी पेडणेकर, वामन पेडणेकर यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. फौंडेशनमार्फत 2 हजारांहून अधिक नोटबुक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविल्या जाणार आहेत. संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर, लोककल्पचे अध्यक्ष अजित गरगट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत.

Related Stories

चोरुन दारूविक्री करणारे दुकान सील

Patil_p

जांबोटी विभागात ‘पाणी आडवा पाणी जिरवा’साठी 8 कोटीचा निधी मंजूर

Patil_p

आरपीडी-बसवेश्वर चौकातील ट्रफिक सिग्नल सुरू

Patil_p

विविध भागांमध्ये आज वीजपुरवठा खंडित

Patil_p

शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीचे नियोजन करा

Amit Kulkarni

अधिक दराने रेमडेसिवीरची विक्री करणाऱयांवर कारवाई करा

Amit Kulkarni
error: Content is protected !!