Tarun Bharat

युवा समितीतर्फे येळ्ळूर मराठी शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण

प्रतिनिधी /येळ्ळूर

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने शैक्षणिक उपक्रमांतर्गत मराठी प्राथमिक मॉडेल स्कूल आणि येळ्ळूरवाडी शाळेमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी येळ्ळूर ग्राम पंचायतीचे अध्यक्ष सतीश पाटील होते.

प्रारंभी दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजन झाले. विविध मान्यवरांच्या हस्ते हे दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी शुभम शेळके म्हणाले, बेळगाव, खानापूर, निपाणी या भागातील 200 हून अधिक शाळांमध्ये 5 हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले आहे. मातृभाषा टिकविण्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवित
आहोत.

येळ्ळूर येथील शाळांमधील पटसंख्या पाहून समाधान व्यक्त करण्यात आले. येळ्ळूरवाडी मराठी शाळेमध्येही साहित्याचे वितरण करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक मनोहर पाटील यांनी केले. या कार्यक्रमाला श्रीकांत कदम, राजू कदम, लक्ष्मण पाटील, चांगदेव मुरकुटे, दिनेश लोहार, आशिष कोचेरी, रितेश पावले, आनंद पाटील, साहील मजुकर उपस्थित होते. प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापिका निलजकर, सूत्रसंचालन पाखरे आणि आभार एम. वाय. कडलीकर यांनी मानले.

Related Stories

इस्कॉनची हरेकृष्ण रथयात्रा 28 जानेवारीपासून

Rohit Salunke

शहर परिसरात जागतिक महिला दिन उत्साहात

Amit Kulkarni

पुढीलवर्षी डिप्लोमा अभ्यासक्रम बदलणार

Patil_p

एमएच 09, सिंहाचा क्रमांक 9, शुभम आपला भाऊ!

Amit Kulkarni

झफरखान सरवरची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

Amit Kulkarni

मैदाने,खुल्या जागांवर अवैध धंद्यांना ऊत

Amit Kulkarni