प्रोत्साहन देण्यासाठी उपक्रमाचे पाचवे वर्ष : मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी यासाठी समितीचा प्रयत्न
प्रतिनिधी /खानापूर
मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी, मराठी शाळा टिकाव्यात, शाळेच्या माध्यमातून मराठी संस्कृती, मराठी भाषा टिकली जाणार आहे. यासाठी बेळगावसह खानापूर, निपाणी, बेळगाव तालुक्यात मराठी माध्यमाच्या शाळांमधून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्याचा उपक्रम गेली पाच वर्षे युवा समितीचे कार्यकर्ते राबवत आहेत. अशी माहिती युवा समितीचे श्रीकांत कदम यांनी दिली. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव यांच्यावतीने शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचे हे पाचवे वर्ष असून मातृभाषेतून शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येतो.
त्याचाच एक भाग म्हणून युवा समितीतर्फे गुरुवारी नंदगड परिसरातील हलशी, हलशीवाडी, नरसेवाडी, सागरे, नंजिनकोंडल आसपासच्या गावातील शाळांमधून शालेय साहित्य वाटप करण्यात आले. नंदगड येथील संत मेलगे सरकारी मराठी शाळा व जेसीएस सरकारी मराठी शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. संत मेलगे शाळेचे मुख्याध्यापक सुरेश मादार यांनी स्वागत केले.
मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पुंडलिक कारलगेकर म्हणाले, आतापर्यंत मातृभाषेतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक असून गावातील सरकारी मराठी शाळांना सर्व प्रकारची मदत करण्यासाठी विविध संघटनांकडून पुढाकार घेतला जात आहे. त्याला युवा समितीची साथ मिळत असल्याची माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. तसेच कणकुंबी-जांबोटी भागातील 35 शाळांमध्ये शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले आहे. येत्या काही दिवसात खानापूर परिसरातील शाळांमधून साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.
पाच हजार विद्यार्थ्यांना साहित्याचे वितरण
युवा समितीच्या या उपक्रमाचे हे पाचवे वर्ष असून यावषी बेळगाव, खानापूर आणि निपाणी तालुक्मयातील जवळपास दोनशे शाळा आणि पाच हजार विद्यार्थ्यांना शालेयपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले आहे. खानापूर तालुक्मयातील 70 शाळांमध्ये हे वितरण होत आहे, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना जास्तीतजास्त मदत मिळावी यासाठी युवा समिती प्रयत्नशील असते.
हा उपक्रम राबविण्यासाठी युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष सूरज कुडूचकर, उपाध्यक्ष अंकुश केसरकर, सचिन केळवेकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, संतोष कृष्णाचे, प्रवीण रेडेकर, राजू कदम, विनायक कावळे, शैक्षणिक सांस्कृतिक प्रमुख सिद्धार्थ चौगुले, प्रतीक पाटील, आशिष कोचेरी, जोतिबा पाटील, आनंद पाटील सर्व विभागातील पदाधिकारी मनोहर हुंदरे, वासू सामजी, रोहित गोमानाचे, किरण मोदगेकर, नागेश बोबाटे, रितेश पावले, अशोक पाटील, सागर बेळगोजी, आकाश भेकणे, साईनाथ शिरोडकर, निखिल देसाई, सुरज कणबरकर, नारायण मुचंडीकर आणि इतर पदाधिकारी तर निपाणी विभागातून बंडा पाटील, लक्ष्मीकांत पाटील, कपिल बेलवळे, अमोल पाटील, नवनाथ पाटील, अमोल शेळके हे विशेष प्रयत्न करत आहेत.