स्वामित्व योजनेंतर्गत लाभार्थ्यांना हक्कपत्रे, ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण
प्रतिनिधी /बेळगाव
केंद्र सरकारच्या स्वामित्व योजनेंतर्गत जिल्हय़ातील 90 गावांतील लाभार्थ्यांना घराच्या हक्कपत्रांचे वितरण करण्यात आले. त्यामुळे लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. 2021 मध्ये जिल्हय़ातील 216 गावांमध्ये ही योजना राबविण्यात आली होती. त्यापैकी 127 गावांचा डिजिटल सर्वेदेखील पूर्ण झाला आहे. त्यामुळे येत्या काळात इतर गावांतूनही हक्कपत्रांचे वाटप होणार आहे.
जिल्हय़ात पाऊस आणि इतर कारणांमुळे ड्रोन सर्वेक्षणाचे काम सध्या तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहे. मात्र, ज्या ठिकाणी पाऊस कमी आहे, त्या ठिकाणी काम निरंतर सुरू आहे. शिवाय इतर ठिकाणीदेखील पाऊस कमी झाल्यानंतर सर्वेक्षणाचे काम हाती घेण्याची सूचना अधिकाऱयांना करण्यात आली आहे.
स्वामित्व योजनेत बेळगाव आणि खानापूर तालुका पिछाडीवर पडला आहे. मात्र, रामदुर्ग, सौंदत्ती, अथणी, कित्तूर आदी तालुक्मयांमध्ये काम सुसाट सुरू आहे. महसूल विभागातील नगर स्थानिक स्वराज्य संस्था वगळता सर्व ग्राम पंचायतींमध्ये सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. मात्र, कर्मचाऱयांची कमतरता, घराशी संबंधित न्यायालयीन वाद, कौटुंबिक वाद आदी कारणांमुळे सर्वेक्षणाच्या कामात अडथळे निर्माण होत आहेत. राज्यात 2021 मध्ये 16 हजार 600 गावांमध्ये ही योजना राबविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. बेळगावसह 16 जिल्हय़ांमध्ये या योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. भूमापन खाते, महसूल खाते, पंचायत राज विकास खाते, भारतीय सर्वेक्षण खाते यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामित्व योजनेचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. अथणी तालुक्मयातील अरटाळ, बडची या गावची प्रायोगिक तत्त्वावर निवड करण्यात आली असून बडची, ब्याडगी, हरळहळ्ळी, अरटाळ, खोतनट्टी, देसरट्टी आदी गावांमध्ये ही योजना यशस्वीपणे राबविली आहे.
ग्राम पंचायत पातळीवर गावठाण आणि गावाबाहेरील घरांचेही सर्वेक्षण सुरू आहे. मात्र, मोजमाप व्यवस्थित होताना दिसत नाही. अपुरे दाखले, घराचे मालकत्व बदल आदी समस्यांमुळे सर्वेक्षणाचे काम संथगतीने सुरू आहे. 2024 पर्यंत सर्व लाभार्थ्यांना हक्कपत्र मिळणे आवश्यक आहे. मात्र, सध्याचे काम पाहता 2024 पर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण होणे धुसर आहे. लाभार्थ्यांना हक्कपत्रे मिळाल्यानंतर यावर राष्ट्रीयीकृत बँकेतून कर्ज आणि शासनाच्या इतर सुविधाही उपलब्ध होऊ शकतात.
उर्वरितांनाही लवकरच हक्कपत्रे वाटप
स्वामित्व योजनेंतर्गत जिल्हय़ातील 90 गावांमधील लाभार्थ्यांना हक्कपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. पाऊस आणि अति वारा यामुळे सर्वेक्षणात अडचणी निर्माण होत आहेत. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर सर्वेक्षणाचे काम सुरळीत सुरू होईल आणि उर्वरित लाभार्थ्यांनाही हक्कपत्रे वितरित केली जातील.
मोहन शिवण्णावर (जिल्हा भूमापन उपनिर्देशक)
तालुका | निवडलेली गावे | सर्वेक्षित गावे | हक्कपत्र वाटप |
बेळगाव | 19 | – | – |
खानापूर | 30 | – | – |
हुक्केरी | 14 | 11 | 11 |
बैलहोंगल | 13 | 10 | 10 |
कित्तूर | 16 | 9 | 9 |
सौंदत्ती | 15 | 13 | 13 |
रामदुर्ग | 22 | 17 | 16 |
गोकाक | 13 | – | – |
मुडलगी | 13 | – | – |
चिकोडी | 8 | 3 | 3 |
निपाणी | 11 | 6 | 6 |
रायबाग | 13 | 4 | 4 |
अथणी | 12 | 15 | 14 |
कागवाड | 17 | 4 | 4 |
एकूण | 216 | 91 | 90 |