Tarun Bharat

मण्णीकेरी येथे आहारधान्य किटचे वितरण

सतीश जारकीहोळी फौंडेशनकडून घरे पडलेल्या 25 कुटुंबीयांना सुपूर्द

वार्ताहर /अगसगे

अतिवृष्टीमुळे घरांची पडझड झालेल्या मण्णीकेरीतील 25 कुटुंबीयांना शनिवारी आमदार सतीश जारकीहोळी फौंडेशनमार्फत आहारधान्य किटचे वितरण करण्यात आले.

गेल्या 2-3 वर्षांपासून पावसाने हाहाकार माजविला आहे. यामुळे जुनी घरे, मातीमध्ये बांधलेली व मातीच्या विटांमध्ये बांधलेली घरे पावसात कोसळत आहेत. यामुळे गोरगरीब कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. भिंती कोसळून काही जनावरेही जखमी झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याची माहिती आमदार सतीश जारकीहोळी यांना मिळताच त्यांनी आपल्या फौंडेशनतर्फे घरे पडलेल्या कुटुंबीयांना आहारधान्य किटचे वितरण करण्याचा आदेश दिला.

आमदारांचे स्वीय साहाय्यक व के.पी.सी.सी. सदस्य मलगौडा पाटील यांनी शनिवारी पडलेल्या घरांची पाहणी केली. नुकसानग्रस्त कुटुंबीयांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले. गावातील लक्ष्मीदेवी मंदिरामध्ये ग्रा.पं. सदस्यांसह नुकसानग्रस्त कुटुंबीयांसोबत बैठक घेऊन नुकसानग्रस्तांची नावे आणि नुकसानीचा आराखडा मागवून घेतला. संबंधित तहसिलदार व जिल्हाधिकाऱयांबरोबर चर्चा करून नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर घरे कोसळून नुकसान झालेल्या 25 कुटुंबीयांना आमदार सतीश जारकीहोळी फौंडेशनमार्फत आहारधान्य किटचे वितरण केले. यावेळी ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related Stories

निपाणीत उरुसाची सांगता

Patil_p

रॅपिडकिट संपल्यामुळे पक्षकारांना नाहक त्रास

Patil_p

इमारतीवरून उडी घेऊन युवकाची आत्महत्या

Amit Kulkarni

किणये ग्रा. पं. मध्ये नवीन चेहऱयांना संधी

Patil_p

परतीच्या पावसाने उडाली शेतकऱयांची झोप

Patil_p

फादर जेकब कार्वालो चषक स्पर्धेत सेंट पॉल्स, सेंट झेवियर्स विजेते

Amit Kulkarni