प्रतिनिधी /बेळगाव
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत आर्थिकदृष्टय़ा कमकुवत असलेल्या कुटुंबांना विशेष करून महिलांना मोफत गॅस सिलिंडरचे वाटप केले जाते. हिंडलगा येथील बायव्वा वसंत मास्ते यांना देखील गॅस सिलिंडरचे वाटप करण्यात आले आहे. अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या आहार निरीक्षकांच्या हस्ते सिलिंडर वितरण करण्यात आले.
गरीब आणि दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबांना महिलांच्या नावे मोफत गॅस सिलिंडर दिले जाते. विशेषतः रेशनकार्डधारक महिलांना घरगुती एलपीजी गॅस उपलब्ध करून दिला जातो. हिंडलगा येथील 87 वर्षांच्या बायव्वा मास्ते या वृद्ध महिलेला गॅस सिलिंडर देण्यात आले आहे.