बेळगाव : आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते कर्नाटक इमारत कामगार व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे देण्यात आलेल्या कामगार किटचे वाटप करण्यात आले.
महांतेश नगर येथील महांत भवनाजवळ विविध बांधकाम कामगार – पेंटर, प्लंबर, गवंडी आदींना किटचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार अनिल बेनके म्हणाले, कामगार कार्डधारकांना किटचे वाटप करण्यात आले असून आज 800 कामगारांनी याचा लाभ घेतला आहे. कामगार मंत्री शिवराम हेब्बार यांना आणखी किट मंजूर करण्याची विनंती आधीच करण्यात आली आहे. आणखी ५ हजार किट येताच त्याचे वाटप करू, असे त्यांनी सांगितले.
या नंतर बांधकाम विभागाचे आयुक्त वेंकटेश शिंदीहट्टी म्हणाले कि, जिल्ह्यातील सर्व मतक्षेत्रात किटचे वाटप करण्यात येत आहे. एका किटला सुमारे ८ हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे याचे उपयोग करून घ्या असे आवाहन केले.