Tarun Bharat

शनैश्वर ट्रस्टतर्फे महाप्रसादाचे वितरण

30 हजार भाविकांची उपस्थिती

प्रतिनिधी /बेळगाव

शनैश्वर एज्युकेशन ऍण्ड सोशल वेल्फेअर ट्रस्ट यांच्यावतीने रविवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शनिजयंतीचे औचित्य साधून दरवषी महाप्रसाद वितरित केला जातो. यावेळी 30 हजारांहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला.

ट्रस्टच्यावतीने 21 वर्षांपासून रक्तदान शिबिर व महाप्रसाद दिला जातो. यावषी रक्तदान शिबिरालाही उत्तम प्रतिसाद मिळाला. रविवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. नागनूर रुद्राक्षी मठाचे अल्लमप्रभू स्वामीजी यांच्या हस्ते महाप्रसादाचे पूजन करण्यात आले. दुपारनंतर महाप्रसादाचे वितरण सुरू करण्यात आले. साप्ताहिक सुटी असल्यामुळे शालेय विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक महाप्रसादासाठी उपस्थित होते.

ट्रस्टचे अध्यक्ष संजय शहा, उपाध्यक्ष अनिल चौधरी, सेपेटरी श्रीकांत देसाई, संजय भावी, शिवाप्पा इटगी, शिवराज पाटील यासह कार्यकर्त्यांनी महाप्रसाद यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली. हजारोंच्या संख्येने परिसरात भाविकांची गर्दी झाली होती.

Related Stories

ऑर्केस्ट्राने घरकुल प्रदर्शनात आणली रंगत

Amit Kulkarni

लक्स इंडस्ट्रीजची दमदार वाटचाल

Amit Kulkarni

शनिवारी 29 नवे रुग्ण, 24 जण झाले कोरोनामुक्त

Patil_p

फायनान्स धारकांकडून होणारा त्रास थांबवा

Patil_p

सुरेश नागोजीचे यांचा कल्लेहोळमध्ये सत्कार

Amit Kulkarni

बुरूड गल्लीत शॉर्टसर्किटने तीन घरांना आग

Amit Kulkarni