प्रतिनिधी /बेळगाव
लम्पीची लागण झालेल्या जनावर मालकांना पशुसंगोपन आणि हिंडाल्को कंपनी मार्फत मोफत औषधांचे किट वितरित केले जात आहेत. तालुक्मयात 4456 हून अधिक जनावरांना लम्पीची लागण झाली आहे. त्यामुळे शेतकऱयांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत लम्पीची लागण झालेल्या जनावर मालकांना औषधांचा मोफत पुरवठा केला जात आहे.
कणबर्गीतील 125 शेतकऱयांना औषधांच्या किटचे वाटप केले आहे. आता बसवनकोळ येथील शेतकऱयांनाही किटचे वाटप करण्यात आले आहे. गोचीड आणि माशांचा नायनाट करण्यासाठी व लम्पीची लागण झालेल्या जनावरांसाठी मोफत औषधे दिली जात आहेत. अनेक ठिकाणी लम्पीग्रस्त जनावरांना वेळेत उपचार मिळत नसल्याने दगाविण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत हिंडाल्को कंपनीमार्फत शेतकऱयांना औषधांच्या किटचे वाटप करण्यात येत आहे.