Tarun Bharat

हिंडलगा येथे राष्ट्रध्वजांचे वितरण

Advertisements

वार्ताहर /हिंडलगा

हिंडलगा येथील श्री महालक्ष्मी देवी यात्रोत्सव संघातील पदाधिकारी व प्रतिनिधींना ग्राम पंचायत सदस्य अशोक कांबळे यांच्यामार्फत राष्ट्रध्वज वितरण करण्याचा कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी यात्रोत्सव संघाचे मार्गदर्शक रमाकांत पावशे होते.

प्रारंभी निवृत्त मुख्याध्यापक प्रकाश बेळगुंदकर यांनी प्रास्ताविक केले. हिंडलगा येथील पहिले वकील व बेळगाव येथील मराठा युवक मंडळाचे माजी अध्यक्ष ऍड. शिवाजी सरप यांच्या निधनानिमित्त मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.

याप्रसंगी राजू कुप्पेकर, खजिनदार उदय नाईक, तुकाराम फडके यांनी अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन मोठय़ा उत्साहात साजरा करण्याबाबत मार्गदर्शन केले. मांजरेकरनगर येथील लक्ष्मी गदगेला बसविलेल्या व्यासपीठावर यावेळी स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचे सर्वानुमते ठरले. उपस्थित पदाधिकारी व प्रतिनिधींना ग्रामपंचायत सदस्य अशोक कांबळे यांनी राष्ट्रध्वजांचे वितरण केले. अध्यक्षीय भाषणात रमाकांत पावशे यांनी अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाबाबत जागृती करण्यासाठी बुधवार दि. 10 रोजी सकाळी 8 वाजता मोटारसायकल रॅली काढण्याचे आवाहन केले.

यावेळी ग्रा. पं. सदस्य यल्लाप्पा काकतकर, विजय जगताप, भरमा कुडचीकर, अनंत कडोलकर, सुनील पावशे, अवधूत चव्हाण, शाहीर घाटगे उपस्थित होते. परशराम कुडचीकर यांनी आभार मानले.

Related Stories

जिल्हा प्रशासनातर्फे राष्ट्रीय जंत निवारण दिन साजरा

Omkar B

जिल्हय़ातील 183 जणांचे अहवाल निगेटिव्ह

Patil_p

कै.वाय. बी. चौगुले यांच्या विचारांचा वसा पुढे चालविण्याची गरज

Patil_p

उद्यमबाग परिसरातील समस्यांना वाली कोण?

Amit Kulkarni

घरपट्टी भरण्यासाठी कर्नाटक वनमध्ये नागरिकांची वर्दळ

Amit Kulkarni

ग्रामीण भागात किल्ले बनविण्याची लगबग

Omkar B
error: Content is protected !!