Tarun Bharat

कणपुंबी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप

Advertisements

ऑपरेशन मदत-इनरव्हील क्लबच्यावतीने वितरण

वार्ताहर /कणकुंबी

कणकुंबी माऊली विद्यालयात विद्यार्थिनींची संख्या पाहता खऱया अर्थाने सावित्रीबाईंचे स्वप्न साकार झाले असे वाटते. मुलगी शिकली तर संपूर्ण घर सुशिक्षित होते, असे मत इनरव्हील क्लबच्या सेपेटरी डॉ. सविता कद्दू यांनी व्यक्त केले. कणकुंबी येथील माऊली विद्यालयात बेळगावच्या आपरेशन मदत टीम व इनरव्हील क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थ्यांना रेनकोट वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा डॉ. सुषमा शेट्टी होत्या.

उपस्थितांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. मुख्याध्यापक एस. जी. चिगुळकर यांनी प्रास्ताविक केले. कणकुंबी विद्यालयात तळावडे, हुळंद, माण, बेटणे गवळीवाडा, हंदीकोप, पारवाड आदी गावांतून दप्तराच्या ओझ्यासह मुसळधार पावसातून चालत येताना विद्यार्थ्यांना फार कष्ट करावे लागतात. यासाठी बेळगावच्या ऑपरेशन मदत टीमचे प्रमुख राहुल पाटील यांनी माउली विद्यालयात परगावाहून चालत येणाऱया विद्यार्थ्यांसाठी रेनकोटची मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार इनरव्हील क्लबच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला.

हायस्कूलच्यावतीने इनरव्हील क्लबच्या प्रेसिडेंट डॉ. सुषमा शेट्टी यांचा शाल अर्पण करून व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ऑपरेशन मदत टीमचे पद्मप्रसाद हुली, सुषमा शेट्टी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी इनरव्हील क्लबच्या आयओएस ममता जैन, माजी अध्यक्षा सुनीता हणमशेट, सदस्या अंजू अगरवाल, श्रुतिका बागी, भारती उपाध्ये आदी उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते शाळा आवारात वृक्षारोपण करण्यात आले. सूत्रसंचालन एन. एस. करंबळकर यांनी केले, तर बी. एम. शिंदे यांनी आभार मानले.

Related Stories

अग्निपथ योजना तातडीने रद्द करा

Amit Kulkarni

अनगोळ येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

Patil_p

बैठकीत शिक्कामोर्तब झाल्यानंतर कुमारस्वामी लेआऊट मनपाकडे

Omkar B

खरेदीसाठी नागरिकांकडून नियमावलीचे उल्लंघन

Amit Kulkarni

मंडोळी हायस्कूलमध्ये मराठी भाषादिन उत्साहात

Amit Kulkarni

शाहूनगरात सकाळी उशिरापर्यंत विद्युत दिवे सुरूच

Amit Kulkarni
error: Content is protected !!