Tarun Bharat

कोयना प्रकल्पग्रस्तांना सातबारांचे वितरण

सातारा : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते कोयनानगर येथील कोयना प्रकल्पग्रस्तांना सातबारांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी प्रकल्पग्रस्तांच्या त्यागातून, संघर्षातून आणि कष्टातून महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणाची निर्मिती झाली आहे. प्रकल्पग्रस्तांनी केलेला त्याग व संघर्ष कधीही विसरता येणार नाही, अशी भावना व्यक्त करत प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न लवकर मार्गी लावले जातील, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली.

अजित पवार म्हणाले, प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या जमिनी, घरे दिल्यामुळे कोयना धरणाची निर्मिती झाली आहे. या निर्मितीमध्ये स्व. यशवंतराव चव्हाण, व स्व.बाळासाहेब देसाई यांचेही मोलाचे योगदान आहे. कोयना धरणाच्या निर्मितीनंतर महाराष्ट्र प्रकाशमय झाला. प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक असून त्यांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावले जातील. मागील जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्मयातील काही गावे बाधित झाली आहेत. या बाधित गावांच्या पूनर्वसनासाठी पर्यायी जागा लवकरात लवकर शोधण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

Advertisements

पालकमंत्री पाटील म्हणाले, कोयना धरण दरवषी शंभर टक्के भरते. यातून 2 हजार मेगावॉट, वीज निर्मिती केली जाते. याबरोबर सातारा व सांगली भागातील शेतीसाठी पाणी वापरले जाते, प्रकल्पग्रस्तांच्या त्यागातून धरणाची निर्मिती झाली आहे. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाची भूमिका सकारात्मक आहे.

यावेळी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर, मदत व पूर्नवसन विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, विभागीय आयुक्त सौरभ राव, प्रभारी जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहीया, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल आदी उपस्थित होते.

Related Stories

एक रुपया टाका अन् शुद्ध पाणी घ्या…

Patil_p

अबब…कराडला 53 रूग्ण वाढले

Patil_p

शेतकर्‍यांच्या सर्वांगिण विकासासाठी ‘चिंचणेर पॅटर्न’ दिशादर्शक

Abhijeet Shinde

तिसऱया दिवशी देखील सातारा कडकडीत बंद

Amit Kulkarni

सातारा : आज-उद्या पाणी पुरवठा कपात

datta jadhav

सातारा, कराड वगळता अन्य तालुके नियंत्रणात

datta jadhav
error: Content is protected !!