अनगोळ सरकारी मराठी शाळा क्र.34 मध्ये उपक्रम
प्रतिनिधी /बेळगाव
अनगोळ येथील सरकारी मराठी मुला-मुलींची शाळा क्रमांक 34 च्या मुला-मुलींना अस्मिता एन्टरप्राईजेसतर्फे शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अस्मिता एन्टरप्राईजेसचे संचालक राजेश लोहार, वसंत सोनोलकर, राष्ट्रीय शरीरसौ÷व पंच सुनील पवार, सुहास कुलकर्णी, प्रदीप झंगरूचे, शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापक एम. एस. मडिवाळ, के. आर. बागेवाडी, आर. एन. पत्तार, शुभांगी पाटील-शिरवळकर, प्रीती खामकर, संजीवनी वादांगेकर या मान्यवरांच्या हस्ते इयत्ता पहिली ते सातवीच्या गरीब व होतकरू मुला-मुलींना वहय़ा वाटप करण्यात आल्या.
याप्रसंगी अस्मिता एन्टरप्राईझेसचे संचालक राजेश लोहार यांनी शाळेच्या विविध उपक्रमासाठी आर्थिक साहाय्य करून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना आपण साहाय्य करणार आहोत. त्याशिवाय क्रीडा व संगणक यांचेही वाटप पुढील काळात करण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी जोमाने आभ्यास करावा व शाळेचे नाव उज्वल करावे, अशा शुभेच्छा दिल्या.