बेळगाव : लोककल्प फौंडेशनच्या वतीने चोर्ला गावातील मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. बॅग, पुस्तक, शालेय स्टेशनरी अशा सर्व आवश्यक वस्तूंचे मुलांना वाटप करण्यात आले.
लोकमान्य सोसायटीने लोककल्प फौंडेशनमार्फत अनेक खेडी दत्तक घेतली आहेत. त्यात चोर्ला हे खेडे गाव समाविष्ट आहे. सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा फायदा झाला. लोककल्प फौंडेशन 32 दत्तक खेडेगावांमध्ये विविध सामाजिक कार्य करीत आहे. मुख्याध्यापिका एस. व्ही. मायाण्णाचे, सहशिक्षक एम. एस. बासूर आणि लोककल्पचे स्वयंसेवक संतोष कदम, सुहासिनी पेडणेकर आणि अनंत गावडे
यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.