प्रतिनिधी /बेळगाव
लोककल्प फाऊंडेशनने बैलूर शाळांना क्रीडा साहित्य भेट दिले. लोककल्प फाउंडेशनने दत्तक घेतलेल्या 32 गावांपैकी बैलूर हे एक गाव आहे. लोककल्प फाउंडेशनचा समाजाच्या सर्वांगीण विकासावर विश्वास आहे. हे तत्त्वज्ञान लक्षात घेऊन बैलूर शाळांतील विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स किटचे वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला. बैलूर गावातील हायस्कूललाही क्रीडा साहित्य देण्यात आले.
दोन्ही शाळांत पहिली ते दहावीपर्यंत मिळून 200 पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. क्रीडा साहित्यात बॅडमिंटन रॅकेट, बॅडमिंटन नेट, शटल कॉक, कॅरम बोर्ड व किट, बुद्धिबळ संच, फ्रिझबीज, लगोरी, दोरीची उडी, क्रिकेट बॅट, बॉल आणि स्टंप आणि बरेच काही यांचा समावेश
होता.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनात खिलाडूवृत्ती आणि शिस्तीची भावना जागृत करण्यास मदत झाली. क्रीडा साहित्य स्वीकारून विद्यार्थी भारावून गेले. त्यांच्या चेहऱयावर आनंद ओसंडून वाहत होता. आयोजकांना नवीन स्फूर्ती देऊन या कार्यक्रमासाठी लोककल्प स्वयंसेवक संतोष कदम, प्रितेश मोतेकर आणि शिक्षक उपस्थित होते.