वनखात्याचा उपक्रम, पर्यावरण संवर्धनासाठी हातभार : नर्सरीतून होणार रोपवाटप
प्रतिनिधी/बेळगाव
पावसाला प्रारंभ झाल्याने रोप लागवडीला सुरुवात झाली आहे. वनखात्यामार्फत विविध वनक्षेत्रात रोप लागवडीचे काम हाती घेण्यात आले आहे. याबरोबर शेतकऱयांना दरवषी सवलतीच्या दरात वनरोपांचे वाटप केले जाते. यंदा खात्याने शेतकऱयांना 1 लाख रोप वाटपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार लवकरच रोपांचे वाटप केले जाणार आहे. संबंधित शेतकऱयांनी वनखात्याच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱयांना उपयुक्त ठरणाऱया काजू, बांबू, सागवान, बाभूळ, गुलमोहोर, फणस, सिसम आदी जातींच्या रोपांचे वितरण होणार आहे. अनुसूचित जाती-जमातीतील आणि अल्पभूधारक शेतकऱयांना ही रोपे वितरित केली जाणार आहेत. बेळगाव विभागाच्या मच्छे, हलभावी, होसकट्टी, शेरूर, खानापूर, ओतोळ्ळी, सावरगाळी, कणकुंबी, गोल्याळी आदी ठिकाणी असलेल्या नर्सरीतून रोपांचे वितरण केले जाणार आहे. तत्पूर्वी शेतकऱयांनी बागायत खात्याच्या कार्यालयात कागदपत्रांसह अर्ज देणे आवश्यक आहे.
झाडांची संख्या वाढविण्यासाठी खात्यामार्फत विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत. याबरोबरच शेतकऱयांना देखील विविध वनझाडांचे वितरण केले जात आहे. यंदा तब्बल एक लाख रोपे वितरित केली जाणार आहेत. शेतकऱयांना ही रोपे शेताच्या बांधावर लागवड करून जतन करता येणार आहेत. विशेषतः सागवान आणि सिसम जातीची रोपेदेखील दिली जाणार आहेत.
तीन लाख रोप लागवड होणार
बेळगाव आणि खानापूर वनक्षेत्रात तब्बल 3 लाख रोपांची लागवड होणार आहे. त्याबरोबर शेतकऱयांनादेखील रोपांचे वाटप केले जाणार आहे. विशेषतः शेतकऱयांना उपयोगी असलेल्या जातीच्या रोपांचे वाटप होणार आहे. लाभार्थी शेतकऱयांनी याचा लाभ घ्यावा.
– शिवानंद मगदूम ( आरएफओ वनखाते)