न्हावेली /वार्ताहर–
मळगांव ऐक्यवर्धक संघ, मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव वतीने मागील अनेक वर्षांपासून विद्यार्थी- विद्यार्थीनी यांच्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांतर्गत शाळेतर्फे यावर्षीही शैक्षणिक साहित्य व गणवेष वितरण सोहळा 2022- 2023 आयोजित करण्यात आला आहे. गुरुवर्य गुरुनाथ पाटकर प्रतिष्ठान, हरीष रावजी मळगांवकर फाऊंडेशन,वंदना सागर तावडे, नंदकुमार प्रभुदेसाई, आनंद राजाध्यक्ष, माजी मुख्याध्यापक तथा शिक्षण सल्लागार स्कूल कमिटी व्ही. टी. देवण, माजी वरिष्ठ लेखनिक बी. डी. गोसावी तसेच इतर दानशूर व्यक्तींनी संस्थेकडे दिलेल्या व ठेवलेल्या ठेवींच्या व्याजाच्या रक्कमेतून गरजू व होतकरू विद्यार्थी- विद्यार्थीनीना दरवर्षी प्रमाणे यावर्षीही गणवेष व शैक्षणिक साहित्य वितरीत केले जाणार आहे.यावर्षीचा हा शैक्षणिक साहित्य व गणवेष वितरण सोहळा शुक्रवार दिनांक 12 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता मळगांव इंग्लिश स्कूल मळगांवच्या चिंतन हेमंत शैलजा परब सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.