मुतगे न्यू इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचे शाळेतर्फे आभार
वार्ताहर /सांबरा
मुतगे येथे द.म.शि. मंडळ संचालित न्यू इंग्लिश स्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांकडून गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एन. डी. बंडाचे होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीताने झाली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. मुख्याध्यापक एम. वाय. केदार यांनी प्रास्ताविक केले. नारायण कणबरकर यांनी परिचय व स्वागत केले.
माजी विद्यार्थी विनायक पाटील यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी पुढील पंधरा दिवसात करिअर गायडन्स कार्यशाळा आयोजित करणार असल्याचे सांगितले. विठ्ठल पाटील यांनी आपल्या मधुर वाणीने सर्वांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी एसबीसीचे ज्ये÷ सदस्य एन. डी. बंडाचे म्हणाले, माजी विद्यार्थ्यांचे शाळेवर खूप प्रेम आहे. या प्रेमाखातर त्यांनी शाळेच्या 80 विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वितरण केले आहे. माजी विद्यार्थ्यांनी आतापर्यंत शाळेसाठी खूप मदत केली आहे. कठीण परिस्थितीतून शिक्षण घेऊन अनेक माजी विद्यार्थी सध्या सुस्थितीत आहेत.
शाळेसाठी त्यांचे सहकार्य सदोदित लाभो. त्यांनी केलेल्या मदतीचे आभार त्यांनी मानले. यावेळी मुख्याध्यापक एस. आर. तिरवीर, भूषण पाटील, महेश जोगाणी, सुधाकर पाटील, शिरीष पाटील, लक्ष्मण पाटील, वसंत पाटील, मधुकर इंगळे, परशराम कणबरकर, सुबोध चौगुले, सचिन पाटील, किसन पाटील, निलेश चौगुले, संदीप पाटील, भैरू पाटील, डॉ. उदय बसापुरे, रवी परमोजी, विनायक पाटील, गजानन पाटील, श्रीराम पाटील, गजानन बंडाचे, दत्ता पाटील, शांताराम शिंदोळकर, महेश बंडाचे, प्रमोद पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन बी. बी. कोंडसकोप यांनी तर आभार टी. डी. कुराडे यांनी मानले.