मुख्य कार्यवाहक पदी adv संतोष सावंत यांची निवड
सावंतवाडी / प्रतिनिधी
सह्याद्री फाउंडेशनच्या नूतन अध्यक्षपदी जिल्हा बँकेचे संचालक रवींद्र मडगावकर तर मुख्य कार्यवाहक पदी adv संतोष सावंत, सचिव पदी प्रताप परब खजिनदार सौ . विभावरी सुकी, उपाध्यक्ष मोहिनी मडगावकर , हर्षवर्धन धारणकर ,सहसचिव गजानन बांदेकर अशी नवीन कार्यकारणी निवडण्यात आली आहे. कोरोना महामारीनंतर आता सावंतवाडीत सांस्कृतिक, सामाजिक, आरोग्य ,शिक्षण ,संगीत ,या क्षेत्राला एक नवी दिशा देण्याच्या दृष्टीने सह्याद्री फाउंडेशन कार्यरत आहे. सावंतवाडी ग्रामीण भागातील लोक शहरात नोकरी , व्यवसाय या निमित्ताने कार्यरत आहेत. अशा सह्याद्री पट्ट्यातील मंडळींनी एकत्र येऊन गेल्या पंधरा वर्षांपूर्वी हे फाउंडेशन स्थापन केले आहे. आतापर्यंत या फाउंडेशनच्या माध्यमातून सावंतवाडी शहरात सांस्कृतिक, सामाजिक चळवळ वाढवली जात आहे. या फाउंडेशनची वार्षिक बैठक माडखोल धरण येथील सावंत फार्म हाऊस येथे बुधवारी सायंकाळी झाली. संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नवीन कार्यकारणी निवडण्याबाबत चर्चा झाली.यावेळी मावळते अध्यक्ष प्रल्हाद तावडे सचिव सुहास सावंत यांनी गेली तीन वर्ष कोरोना महामारीचा काळ असतानाही काम केले. आता या फाउंडेशन ची व्याप्ती वाढत चालली आहे त्या अनुषंगाने या फाउंडेशनच्या अध्यक्षपदी जिल्हा बँकेचे संचालक माजी सभापती तथा संस्थापक सचिव रवींद्र मडगावकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.