प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिल्हा को-ऑप. बँक असोसिएशनच्यावतीने सहकारी बँकांच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे नूतन चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी असोसिएशनचे अध्यक्ष बाळाण्णा कग्गणगी होते.
असोसिएशनचे सेपेटरी पी. एस. ओऊळकर यांनी प्रास्ताविक केले. मराठा बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे नूतन चेअरमन बाळासाहेब काकतकर (असोसिएशनचे उपाध्यक्ष) यांचा सत्कार असोसिएशनचे अध्यक्ष बाळाण्णा कग्गणगी यांच्या हस्ते करण्यात आला. बसवेश्वर बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे नूतन चेअरमन बाळाण्णा कग्गणगी यांचा सत्कार असोसिएशनचे गौरवाध्यक्ष एम. डी. च्युनमरी यांच्या हस्ते करण्यात आला.
गोकाक अर्बन बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे नूतन चेअरमन एम. डी. च्युनमरी यांचा सत्कार असोसिएशनचे खजिनदार ए. के. महाजन शेट्टी (पाच्छापूर बँक अध्यक्ष) यांच्या हस्ते करण्यात आला. बेल्लद बागेवाडी अर्बन बँकेच्या बोर्ड मॅनेजमेंटचे नूतन चेअरमन आर. टी. शिराळकर (असोसिएशनचे संचालक) यांचा सत्कार असोसिएशनचे सेपेटरी पी. एस. ओऊळकर (तुकाराम बँक संचालक) यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी दैवज्ञ बँकेचे माजी जनरल मॅनेजर एम. एस. शेठ, शांताण्णा मिरजी, बँकचे माजी जनरल मॅनेजर बी. ए. भोजकर, गोकाक अर्बन बँकेचे जनरल मॅनेजर एस. एस. पाटील यांनी निवडीबाबत गौरवोद्गार काढले. बेळगाव जिल्हा को-ऑप. अर्बन बँक असोसिएशनचे पदाधिकारी वाय. एस. गिरजी, एस. बी. निलजगी, एस. बी. पत्तेन्नावर, एस. एम. रेवणकर, रत्नप्रभा बेल्लद, मराठा बँकेचे जनरल मॅनेजर संतोष धामणेकर, एस. जी. ढवळेश्वर तसेच बेळगाव जिल्हय़ातील विविध सहकारी बँकांचे पदाधिकारी उपस्थित होते.