प्रतिनिधी/ बेळगाव
दि. 19 ते 30 डिसेंबरपर्यंत सुवर्णविधानसौधमध्ये होणाऱया कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱयांनी शनिवारी हॉटेल मालक व चालकांची बैठक घेतली. अधिवेशनासाठी बेळगावला येणारे आमदार, मंत्री, अधिकारी आदींना सर्व सुविधा पुरविण्यासाठी आवश्यक तयारी करण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱयांनी केले.
महानगरपालिकेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, पालिका आयुक्त डॉ. रुदेश घाळी आदी अधिकारीही उपस्थित होते. अधिवेशनासाठी अद्याप 1 महिन्याचा कालावधी आहे. याकाळात स्वच्छता व इतर कामे उरकण्यासाठी प्राधान्य द्यावे, अधिवेशनासाठी बेळगावला येणाऱया अतिथींची गैरसोय होऊ नये, यासाठी आवश्यक सर्व तयारी करण्याची सूचना जिल्हाधिकाऱयांनी केली.
हिवाळी अधिवेशनासाठी बहुतेक हॉटेलमधील खोल्यांचा ताबा जिल्हा प्रशासन घेणार आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या काळात इतरांसाठी बुकिंग करू नये. मंत्री, आमदार, वरि÷ अधिकारी आदींना निवासाची व्यवस्था पुरविण्यासाठी हॉटेल मालकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केले.