Tarun Bharat

Special story : जिह्यातील २६ हजार मतदारांची नावे रद्द

मयत, दुबार, स्थलांतरित यांचा समावेश; सर्वाधिक इचलकरंजी मतदारसंघातील 5900 मतदार; जिल्हा निवडणूक विभागाकडून कार्यवाही

प्रवीण देसाई : कोल्हापूर

जिल्हा निवडणूक विभागाकडून जिह्यातील २६ हजार ९४१ मतदारांची नावे रद्दची कार्यवाही करण्यात आली आहे. मयत, दुबार, स्थलांतरीत मतदारांचा यामध्ये समावेश आहे. निरंतर मतदार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत 1 जानेवारी ते आजअखेरपर्यंतची ही आकडेवारी आहे. यामध्ये सर्वाधिक इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील 5 हजार 900 व त्या खालोखाल कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील ४९६२ मतदारांचा समावेश आहे.
भारत निवडणूक आयोगाकडून निरंतर मतदार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरु आहे. त्याअंतर्गत १ जानेवारी ते आजअखेर जिह्यातील २६ हजार ९४१ मतदारांची नावे रद्द करण्यात आली आहेत. मयत, दुबार, स्थलांतरीतांच्या नावाचा यामध्ये समावेश आहे. सर्वाधिक इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील ५ हजार ९०० मतदार, त्या खालोखाल कोल्हापूर दक्षिण विधासभा मतदारसंघातील ४ हजार ९६२, शिरोळ विधानसभा मतदारसंघातील ४ हजार २७२, कागल विधानसभा मतदारंघातील ४ हजार १६७, कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील ४ हजार २४६ मतदार आहेत. त्याचबरोबर करवीर विधानसभा मतदारसंघातील एकाही मतदाराचे नाव रद्द झालेले नाही. तर राधानगरी विधानसभा मतदारसंघात १ नाव रद्द झाले आहे. तसेच रद्द झालेल्यांमध्ये १३ हजार ६७० पुरुष मतदार व ११ हजार ९१६महिला मतदार व १ इतर मतदाराचा समावेश आहे.
जिल्हा निवडणूक विभागाकडून ही कार्यवाही करण्यात आली आहे. पुरावे व कागदपत्रे यांची शहानिशा करुन, तसेच यावर सुनावणी झाल्यानंतर ही नावे रद्द करण्यात आली आहेत.
मतदार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत १ जानेवारी ते आजअखेर जिह्यात २६ हजार ९४१ इतक्या मतदारांची नावे रद्द करण्यात आली आहेत. यामध्ये मयत, दुबार व स्थलांतरीतांचा समावेश आहे.
भगवान कांबळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी
जिह्यातील रद्द झालले मतदार
विधानसभा पुरुष मतदार महिला मतदार इतर एकूण
चंदगड 901 1700 – 2601
राधानगरी – – 1 1
कागल 2082 2085 – 4167
कोल्हापूर दक्षिण 2644 2318 – 4962
करवीर – – – –
कोल्हापूर उत्तर 2069 2195 – 4264
शाहूवाडी 328 367 – 695
हातकणंगले 79 – – 79
इचलकरंजी 3219 2681 – 5900
शिरोळ 2714 1558 – 4272
एकूण 13670 11916 – 26941

Related Stories

अस्वलवाडीत झाड तोडण्यावरून मारामारीत दोन जखमी

Archana Banage

वारणा महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ. डी. टी. शिर्के यांचा कुलगुरूपदी निवड झाल्याबद्दल सत्कार

Archana Banage

आंतरराष्ट्रीय बिच गेम्समध्ये नारायण मडकेला सुवर्ण, रौप्य

Archana Banage

वृध्द आईला न सांभाळणाऱ्या पशुधन पर्यवेक्षकाला दणका,पोटगी देण्याचा प्रांताधिकाऱ्यांचा आदेश

Archana Banage

दीड हजाराची लाच घेताना यड्रावचा पोलीस पाटील लाचलुचपतच्या जाळ्यात

Archana Banage

अवैध होर्डिंगचा महापालिकेला कोट्य़वधींचा चुना

Archana Banage