क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
मिरामारच्या शारदा मंदीर स्कूलच्या 14 वर्षांखालील बुद्धिबळ संघांनी क्रीडा खात्याने आयोजित केलेल्या उत्तर गोवा तालुका आंतर शालेय बुद्धिबळ स्पर्धेतील दोन्ही विभागातील जेतेपदे मिळविली. या स्पर्धेचे आयोजन म्हापसा-पेडे येथील इनडोअरमध्ये झाले. शारदा मंदीराचे प्रतिनिधीत्व एडन, अर्थ कारापूरकर, पार्थ कामत, धुव देसाई, जी. हर्षवर्धन, आहमा नाईक, माही सावंत, विरजा देसाई, शायना नाईक व एम. आर्याने केले.
मुलांच्या विभागात शारदा मंदीरला जेतेपद तर डिचोलीतील शांतादुर्गा हायस्कूलला उपविजेतेपद तर मुलींच्या विभागात शारदा मंदीरला जेतेपद तर म्हापसाच्या आमोणकर विद्यामंदीर हायस्कूलच्या संघाला उपविजेतेपद मिळाले. या स्पर्धेचे आयोजन विभागीय क्रीडा अधिकारी सुनील गावस यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.