बेळगाव : कर्नाटक राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष वकील सी. एस. इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच बेळगाव जिल्हाध्यक्ष जोतिबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची बेळगाव येथे जिल्हास्तरीय बैठक पार पडली. बैठकीला कर्नाटक राष्ट्रवादीचे प्रभारी सदस्य प्रकाश मोरे तसेच चिकोडी विभागाचे अध्यक्ष सरदार खान पठान यांनी उपस्थित राहून पक्षविस्तार संदर्भात मार्गदर्शन केले. बैठकीत बेळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची नवीन कार्यकारिणी करण्यात आली. बैठकीत उपस्थित अल्ताफ सनदी, सोहेल कित्तूर, गौतम कांबळे, दुर्गेश मेत्री, राय जाधव, महांतेश कोळूचे, हर्षवर्धन पाटील, गीता जगपन्नवर, मुनीर लद्दीफ यांना पदाधिकार देण्यात आले. प्रभावती भालेकर यांनी आभार मानले.
Previous Articleशेवटच्या श्रावण सोमवारनिमित्त मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी
Next Article रेबीजच्या अटकावासाठी विशेष मोहीम
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.