खानापूर : तालुक्यातील नरसेवाडी येथील प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक गोपाळ एन. पाटील यांना यावर्षीचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
ते नंजिनकोडल (ता. खानापूर) येथील राहणारे असून धडाधडीचे शिक्षक म्हणून तालुक्यात ओळखले जातात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन पुरस्कार बहाल केल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
शिक्षकदिनी कुमार गंधर्व कला मंदिर येथे झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री गोविंद कारजोळ, आमदार अनिल बेनके, मुख्यमंत्र्यांचे दिल्लीतील प्रतिनिधी शंकरगौडा पाटील आदींच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. यावेळी जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड, जिल्हाधिकारी, जिल्हा शिक्षक संघाचे पदाधिकारी, विविध संघ-संस्थांचे पदाधिकारी व शिक्षक उपस्थित आहेत.