प्रतिनिधी-बांदा-
दिव्या ज्योती स्कूल पानवळ डेगवे या प्रशालेतून माध्यमिक शालांत परीक्षेत 30 विद्यार्थी प्रविष्ठ होऊन 30 विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने शाळेचा निकाल 100 टक्के लागला आहे.प्रथम क्रमांक आर्या परब व कावेरी परब (94.40टक्के), द्वितीय अथर्व पाटील व जयदत्त सावंत ( 91.80टक्के), तृतीय प्रतीक सावंत 91.40 टक्के यांनी क्रमांक पटकावला. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्था संचालक मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आले.