बेळगाव : मध्यप्रदेश भोपाळ येथे होणाऱ्या खेलो इंडिया राष्ट्रीय महिला ज्युडो लिग स्पर्धेसाठी बेळगावच्या डीवायईएसच्या ज्युडो खेळाडू दिव्या पाटील व संध्या चौबे यांची कर्नाटक संघात निवड करण्यात आली आहे. बेंगळूर येथे घेण्यात आलेल्या खेलो इंडिया राज्यस्तरीय महिलांच्या साखळी ज्युडो स्पर्धेत दिव्या पाटील हिची 44 किलो वजनी गट सब ज्युनियर गटात कास्यपदक पटकावले आणि चषकासह रोख 6 हजार रुपयांचे बक्षीस पटकावले. संध्या चौबे 70 किलोवरील कॅडेट गटात कास्यपदकासह 8 हजार रुपयांचे रेख रकमेचे बक्षीस तिने पटकाविले. या कामगिरीची दखल घेऊन भोपाळ येथे होणाऱ्या खेलो इंडिया राष्ट्रीय महिला ज्युडो स्पर्धेसाठी बेळगाव डीवायईएस क्रीडा खात्याच्या ज्युडो संघात त्यांची निवड झाली आहे. या दोन्ही ज्युडो खेळाडूंना डीवायईएसच्या ज्युडो प्रशिक्षक रोहिणी पाटील व कुतुजा मुल्तानी यांचे बहुमुल्य मार्गदर्शन लाभत आहे.
Previous Articleराज्यस्तरीय पॅरा टेटे स्पर्धेत संजीव हम्मन्नावर विजेते
Next Article आळवंत स्पोर्ट्स क्लब तुरमुरीतील स्पर्धेत विजेते
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.