पहिल्या टप्प्यात जिल्ह्य़ातील 1 लाख 29 हजार 262 शेतकरी पात्र; ग्रामपंचायत, सेवा सोसायटी बँक शाखांमध्ये याद्या उपलब्ध; आधार प्रमाणिकरण केल्यानंतर तत्काळ बँक खात्यात पैसे जमा
कोल्हापूर प्रतिनिधी
दिवाळीच्या तोंडावर जिल्हय़ातील शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचे पैसे मिळायला सुरवात झाल्याने शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हय़ातील 1 लाख 29 हजार 262 शेतकरी अनुदानास पात्र ठरले आहेत. आधार प्रमाणिकरण केल्यानंतर संबंधित शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये तत्काळ अनुदानाची रक्कम जमा होणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी दिली. गुरुवारी दिवसभरात 12 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केले असून त्यांच्या खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा झाल्याचेही उपनिबंधक शिंदे यांनी सांगितले.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा तत्कालीन महाविक आघाडी सरकारने केली होती. तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रोत्साहनचे पैसे जमा होण्यास सुरवात झाली आहे.
जिल्हय़ातील 1 लाख 29 हजार शेतकरी पात्र
पीक कर्जाची नियमीत परतफेड करणाऱया जिल्हय़ातील 3 लाख 19 हजार 803 शेतकऱ्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती. शासनाच्या निकषांनुसार पहिल्या टप्प्यात यामधील 1 लाख 29 हजार 264 शेतकरी पात्र ठरले आहेत. तर दूसऱ्या टप्प्यात आणखी 30 ते 40 हजार शेतकरी पात्र ठरतील असा अंदाज आहे.
सर्व गावांमध्ये याद्या उपलब्ध
जिल्हय़ातील प्रत्येक गावाच्या ग्रामपंचायत कार्यालयासह विकास सेवा संस्था, जिल्हा बँक, राष्ट्रीयकृत बँक शाखांमध्ये अनुदानास पात्र शेतकऱ्यांच्या नावांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. याठिकाणी शेतकऱ्यांना याद्या पाहता येणार आहेत.
आधार प्रमाणिकरण मोफत
महा ई सेवा केंद्र, सीएससी सेंटर, आपले सरकार सेवा केंद्र, बॅक शाखा, विकास सेवा संस्था येथे आधार प्रमाणिकरणाची मोफत सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. याठीकाणी जाऊन आधार प्रमाणिकरण केल्यानंतर पात्र शेतकऱयांच्या बँक खात्यामध्ये तत्काळ अनुदानाचे पैसे जमा होणार आहे. प्रमाणिकरण पूर्णपणे मोफत असल्याने आधार प्रमाणिकरणासाठी कोणी पैशाची मागणी केल्यास संबंधिता विरोधात जिल्हा उपनिबंधक कार्यालयात तक्रार करण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी केले आहे. तालुकानिहाय अनुदानास पात्र शेतकऱयांची आकडेवारी पुढीलप्रमाणे
तालुका पात्र शेतकरी संख्या
करवीर 20678
हातकणंगले 2086
शिरोळ 4715
राधानगरी 11706
पन्हाळा 11529
कागल 1 2847
चंदगड 1 2852
गडहिंग्लज 9594
भुदरगड 8907
शाहूवाडी 3838
गगनबावडा 2270
आजरा 8117
कोल्हापूर (शहर) 121
एकूण 129262